वाहन चालन कौशल्य चाचणीच्याअनुषंगाने वेळ बदलाबाबतची नोंद घेण्याचे आवाहन*

तारां कित Avatar

 

 

पुणे, दि.१० :पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण कार्यालयातील पोलीस शिपाई चालकांची वाहन चालन कौशल्य चाचणी १२, १५, १९ व २२ जुलै रोजी सकाळी नियोजित असल्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या सकाळच्या सत्रातील ८.३० ते १२ वाजेपर्यतच्या कालावधीतील अनुज्ञप्ती चाचणी ह्या दुपारी १२ वा. सुरू करण्यात येणार आहे.

 

गैरसोय टाळण्यासाठी अनुज्ञप्ती चाचणीकरीता येणाऱ्या अर्जदार व मोटार शिकवणी शाळा संचालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.

0000

Tagged in :

तारां कित Avatar