रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी अमिता नेने

तारां कित Avatar

पुणे, 10 जुलै 2024 : रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी वर्ष 2024-25 साठी अमिता नेने यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये सचिव राजस फडके,खजिनदार अमित आपटे,क्लबचे प्रशासकीय संचालक वैदेही जोग,सेवा प्रकल्प संचालक अंजली सहस्त्रबुध्दे व रेश्मा सांबरे,सीएसआर प्रमुख मुकुंद चिपळूणकर,सदस्यत्व संचालक शिल्पा चौधरी, फाऊंडेशन संचालक पद्मा शहाणे, युवा संचालक माधवी मेहेंदळे, जनसंपर्क संचालक दीपक बोधनी, आयटी ऑफिसर प्रेरणा जोशी व प्रेसिडेंट इलेक्ट माधवी चौहान यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारिणीने एरंडवणे येथील श्री गणेश सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्यात पदभार स्वीकारला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व डिस्ट्रीक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन संतोष मराठे यांसह सहाय्यक प्रांतपाल अतुल अत्रे उपस्थित होते.अमिता नेने यांनी मावळत्या अध्यक्ष सुरेखा देशपांडे यांच्याकडून पदभार स्विकारला.

 

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यावर्षी आरोग्यसेवा,ग्रामविकास,जल संवर्धन यासारख्या सेवा उपक्रमांवर भर देणार असल्याचे अमिता नेने यांनी सांगितले.

 

Tagged in :

तारां कित Avatar