सॅमसंगने नवीन फोल्‍डेबल फोन्‍स गॅलॅक्‍झी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ लाँच करत गॅलॅक्‍सी एआयला नेले नव्‍या उंचीवर

तारां कित Avatar

पॅरिस – जुलै १०, २०२४ – सॅमसंगने आज पॅरिसमधील गॅलॅक्‍सी अनपॅक्‍ड येथे नवीन गॅलॅक्‍झी झेड फोल्‍ड६ व गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ यांसह गॅलॅक्‍सी बड्स३ आणि गॅलॅक्‍सी बड्स३ प्रो ची घोषणा केली. नवीन गॅलॅक्‍सी झेड सिरीजच्‍या लाँचसह सॅमसंग अद्वितीय मोबाइल अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या सर्वात वैविध्‍यपूर्ण व स्थिर फॉर्म फॅक्‍टरचा फायदा घेत गॅलॅक्‍सी एआयच्‍या नवीन चॅप्‍टरची सुरूवात करत आहे. गॅलॅक्‍सी एआय शक्तिशाली, सर्वोत्तम व टिकाऊ फोल्‍डेबल अनुभवाचा वापर करत संवाद, उत्‍पादनक्षमता व सर्जनशीलतेच्‍या नवीन युगाला गती देते.

 

”सॅमसंगच्‍या नाविन्‍यतेच्‍या दीर्घकालीन वारसामुळे आम्‍हाला मोबाइल क्षेत्रात अग्रस्‍थानी राहण्‍यास मदत झाली आहे, जेथे आम्‍ही फोल्‍डेबल फॉर्म फॅक्‍टर तयार केला आहे आणि मोबाइल एआय युगामध्‍ये प्रवेश केला आहे. आता, आम्‍ही या दोन पूरक तंत्रज्ञानांना एकत्र करण्‍यास आणि जगभरातील वापरकर्त्‍यांना नवीन क्षमतांना अनलॉक करण्‍यास उत्‍सुक आहोत,” असे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स येथील मोबाइल ईएक्‍स्‍पेरिअन्‍स बिझनेसचे अध्‍यक्ष व प्रमुख टीएम रोह म्‍हणाले. ”आमचे फोल्‍डेबल्‍स प्रत्‍येक वापरकर्त्‍याच्‍या अद्वितीय गरजांची पूर्तता करतात आणि आता गॅलॅक्‍सी एआयच्‍या क्षमतेसह सॅमसंग अभूतपूर्व अनुभव देत आहे.”

 

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ हे आतापर्यंतचे सर्वात स्लिम व वजनाने हलके गॅलॅक्‍सी झेड सिरीज स्‍मार्टफोन्‍स आहेत, जे पोर्टेबिलिटीसाठी ऑप्टिमाइज करण्‍यात आले आहेत. परिपूर्ण सममितीय डिझाइनसह स्‍ट्रेट एज (कडा) आकर्षक फिनिशिंग देते, तर गॅलॅक्‍झी झेड फोल्‍ड६ वरील नवीन कव्‍हर स्क्रिन रेशिओ अधिक नैसर्गिक बार-टाइप व्‍युइंग अनुभव देते. तुम्‍हाला अधिक मन:शांती देण्‍यासाठी नवीन गॅलॅक्‍सी झेड सिरीज सुधारित आर्मर अॅल्‍युमिनिअम आणि कॉर्निंग गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस २ सह देखील सुसज्‍ज आहे, ज्‍यामुळे ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ गॅलॅक्‍सी झेड सिरीज आहे.

 

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि फ्लिप६ मध्‍ये स्‍नॅपड्रॅगन जेन ३ मोबाइल प्‍लॅटफॉर्म फॉर गॅलॅक्‍सी हे सर्वात प्रगत स्‍नॅपड्रॅगन मोबाइल प्रोसेसर, तसेच दर्जात्‍मक सीपीयू, जीपीयू आणि एनपीयू कार्यक्षमता आहे.

 

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ मध्‍ये अनेक एआय-समर्थित वैशिष्‍ट्ये व टूल्‍स आहेत, जसे नोट असिस्‍ट, पीडीएफ ओव्‍हरले ट्रान्‍सलेशन, कंपोजर, स्‍केच टू इमेज आणि इंटरप्रीटर, जे मोठ्या स्क्रिनचा आकार वाढवण्‍यासह उत्‍पादकता वाढवते.

 

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ अपग्रेडेड गेमिंग अनुभव देतो, ज्‍यामध्‍ये शक्तिशाली चिपसेट आणि दीर्घकाळापर्यंत गेमचा आनंद घेण्‍यासाठी १.६ पट मोठी वेपर चेम्‍बर आहे. असे असले तरी कार्यक्षमता कायम राहते.

 

गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ पोर्टेबिलिटीसाठी ऑप्टिमाइज करण्‍यात आला आहे. तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये नवीन कस्‍टमायझेशन व क्रिएटिव्‍हीटी वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे तुम्‍ही प्रत्‍येक क्षणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

 

३.४-इंच सुपर एएमओएलईडी फ्लेक्‍सविंडा पुन्‍हा एकदा सुधारण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे डिवाईस सुरू करण्‍याची गरज न भासता एआय-असिस्‍टेड फंक्‍शन्‍स कार्यरत होतात. तसेच, फ्लेक्‍सविंडो पूर्वीपेक्षा अधिक विजेट्स देते आणि एकाच वेळी विविध विजेट्सच्‍या माध्‍यमातून माहिती तपासण्‍याची सुविधा देते.

 

फ्लेक्‍सकॅम सर्वात वैविध्‍यपूर्ण कॅमेरा अनुभव देतो आणि नवीन क्रिएटिव्‍ह पर्याय अनलॉक करतो. नवीन ऑटो झूमसह फ्लेक्‍सकॅम वस्‍तूला ओळखत फोटोसाठी सर्वोत्तम फ्रेम आपोआपपणे देतो आणि कोणत्‍याही आवश्‍यक अॅडजस्‍टमेंट्सपूर्वी झूम इन व झूम आऊट करतो. यामुळे तुम्‍हाला ग्रुप फोटो काढताना किंवा आकर्षक पार्श्‍वभूमी निवडण्‍यासंदर्भात चिंता करण्‍याची गरज नाही, हे सर्व हँड्स-फ्री आहे.

 

नवीन ५० मेगापिक्‍सल वाइड आणि १२ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड सेन्‍सर्स सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटोंसह अपग्रेडेड कॅमेरा अनुभव देतात. नवीन ५० मेगापिक्‍सल सेन्‍सरमध्‍ये नॉइज-फ्री फोटोंसाठी 2x ऑप्टिकल झूम आहे, तर जवळपास 10x झूमसह प्रगत शूटिंग अनुभवासाठी एआय झूम आहे.

 

तुम्‍ही बॅटरी संपण्‍याची चिंता न करता गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ च्‍या सर्व क्रिएटिव्‍ह व कस्‍टमायझेबल वैशिष्‍ट्यांचा वापर करू शकता, जेथे हार्डवेअर व सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनमुळे स्‍मार्टफोन दीर्घकाळापर्यंत वापरता येऊ शकतो.

 

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि फ्लिप६ ला सॅमसंग गॅलॅक्‍सीचे डिफेन्‍स-ग्रेड सॅमसंग नॉक्‍सचे संरक्षण देण्‍यात आले आहे. हे मल्‍टी-लेयर सिक्‍युरिटी प्‍लॅटफॉर्म महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करण्‍यासोबत एण्‍ड-टू-एण्‍ड हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्‍शन आणि कोलॅबोरटिव्ह प्रोटेक्‍शनसह असुरक्षिततांपासून संरक्षण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

 

गॅलॅक्‍सी बड्स३ सिरीज: गॅलॅक्‍सी एआयच्‍या माध्‍यमातून कनेक्‍टेड अनुभवामध्‍ये वाढ

 

गॅलॅक्‍सी एआयच्‍या क्षमतेसह गॅलॅक्‍सी बड्स३ सिरीज नवीन कम्‍युनिकेशन अनुभव देत आहे. गॅलॅक्सी बड्स३ सिरीज नवीन कम्‍प्‍युटेशनल डिझाइनसह येते, जी आरामशीरपणे फिट बसते. प्रीमियम ब्‍लेड डिझाइन ब्‍लेड लाइट्सना पूरक अल्‍ट्रा-स्‍लीक व आधुनिक स्‍टाइलच्‍या माध्‍यमातून स्‍टाइल-प्रेमी ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. ही नवीन डिझाइन अधिक सर्वोत्तम प्रत्‍यक्ष अनुभव देण्‍यासोबत ब्‍लेडवर वर-खाली पिंच किंवा स्‍वाइप करत डिवाईसवर नियंत्रण ठेवण्‍याची सुविधा देते, ज्‍यामधून अधिक सोयीसुविधा व आकर्षकता मिळते. गॅलॅक्‍सी बड्स३ आणि बड्स३ प्रो दोन हेतूपूर्वक निर्माण केलेल्‍या डिझाइन पर्यायांसह येतात. गॅलॅक्‍सी बड्स३ प्रो सर्वोत्तम साऊंडचा शोध घेणाऱ्यांसाठी कॅनल टाइप आहे, तर बड्स३ दीर्घकाळापर्यंत विविध स्थितींमध्‍ये डिवाईसचा वापर क

रणाऱ्यांसाठी ओपन टाइप आहे.

Tagged in :

तारां कित Avatar