आग्य्राहून सुटका’ स्मृतिदिनानिमित्त पुण्यात लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात साजरा पुणे महानगरपालिका व श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन ; यंदा ३५७ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन किल्ले राजगड उत्सव वर्षे ४३ वे

तारां कित Avatar

पुणे : जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा… छत्रपती शिवाजी महाराज की जय…असा जयघोष आणि पुणेकरांनी शिवरायांची मूर्ती ठेवलेली पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी करीत साजरा केलेला आनंदोत्सव… अशा शिवमय झालेल्या वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त आयोजित लाक्षणिक पालखी सोहळा पुण्यात उत्साहात साजरा झाला. शिवरायांच्या आग्य्राहून सुटका या घटनेला ३५७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालखी सोहळा व उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५७ व्या आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ‘किल्ले राजगड उत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून सुखरुप किल्ले राजगड येथे परतले, त्या घटनेला ३५७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यामध्ये लाल महाल येथे लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पुणे मनपा उपायुक्त माधव जगताप, शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, राजगडाचे गडकरी राजेंद्र सूर्यकांत भोसले, व्याख्यात्या सायली गोडबोले, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे, कार्यकारी समितीचे अध्यक्ष संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, उत्सव समिती अध्यक्ष सुनील वालगुडे,समीर रुपदे, संपत चरवड, सतीश सोरटे, राहुल पायगुडे,अभिजित पायगुडे, रामभाऊ पारीख, संजय मोरे, आदी उपस्थित होते. यंदा उत्सवाचे ४३ वे वर्ष आहे.

यावेळी पोवाडा व ढोल वादन सादरीकरण दि पूना स्कूल अ‍ँड होम फॉर ब्लाइंड ट्रस्ट यांनी केले. एच.व्ही.देसाई महाविद्यालयचे इतिहास विभाग प्रमुख गणेश राऊत, उपस्थित होते जिजाऊ साहेब यांचे चरित्र सायली गोडबोले-जोशी यांनी त्यांच्या भाषण सांगितले. आग्र्याहून सुटकेचा दिवस हा शिवरायांचा पुर्नजन्म होता. त्यामुळे दरवर्षी पुण्यात आणि गडावर उत्सव साजरा केला जातो.

यावर्षी दि. १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी आग्य्राहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खु. येथील खंडोबाचा माळ व गडावरती साजरा करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर,वक्ते, इतिहासकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव शनिवार दि.१६ डिसेंबर २०२३ सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. स्थिर वादन, मर्दानी खेळ होतील. सायली गोडबोले-जोशी यांचा राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर होईल. अ‍ॅड. रवींद्र यादव यांचे शिव व्याख्यान होईल. किल्ले राजगड पद्मावती माता मंदिर येथे शनिवारी गड जागरण कार्यक्रमांतर्गत आग्यार्हून सुटका याविषयी प्रास्ताविक भाषण होईल व व्याख्यात्यांची व्याख्याने होतील.

रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ सकाळी ६ वा किल्ले राजगड येथे सूर्योदयाला ध्वजारोहण होईल. किल्लेदार सुर्यकांत भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन होणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज पालखी सोहळा ढोल, ताशांच्या गजरात पाली दरवाजा – सदर – पद्मावती माता मंदिर असा होणार आहे. तरी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar