भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी अभिनंदन करतो.
गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रोजगार, कौशल्य विकास, लघु व मध्यम उद्योग आणि मध्यमवर्गीय ही अर्थसंकल्पाची मुख्य थीम आहे.
१ लाख २५ हजार ६३८ कोटी रुपयांची शिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी माफक व्याजावर दहा लाखांचे कर्ज, युवकांना पहिल्या नोकरीत अर्थसाह्य, शिक्षण, कौशल्य विकास व रोजगार वाढीचे लक्ष्य अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करणारा अतिशय संतुलित असा आजचा अर्थसंकल्प आहे.
पाच वर्षांत २० लाख युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण, १००० औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे अद्ययावतीकरण, उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना यामुळे उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.