मुद्रांक शुल्क अभय योजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

तारां कित Avatar

 

पुणे, दि. 23 : मुद्रांक शुल्क अभय योजनेत 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत निष्पादित केलेले, नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि शास्तीमध्ये सवलत देण्यासाठी मुद्रांक शुल्क अभय योजना राबविण्यात येत असून दुसऱ्या टप्प्याला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आणि त्याची विभागीय मंडळे, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (सिडको), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, विकास किंवा अंतर्गत राज्य शासनाने मंजूर केलेले किंवा स्थापन केलेले नियोजन प्राधिकरण यांच्या जमिनीवर वसलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेने निवासी अथवा अनिवासी युनिट्सबाबतचे पहिले वाटपपत्र, शेअर सर्टिफिकेट, स्टँप नसलेल्या कोऱ्या कागदावर किंवा लेटर हेडवर निष्पादित केलेले, अंमलात आणलेले करार यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

 

या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले आहे

Tagged in :

तारां कित Avatar