पुणे (निगडी ) – सर्वसामान्य कुटुंबातून आलेले व नुकतेच आमदार झालेले अमित गोरखे यांनी निगडी ओटा स्किम झोपडपट्टीतील गरीब लोककलावंत हलगीवादक नाना कांबळे यांच्या घरी अचानक भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .तसेच राज्यसरकारच्या वतीने कलावंतासाठी विशेष योजना सुरु करण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी यावेळी आस्वासन दिले .
यावेळी नाना कांबळे म्हणाले की ,असाच आमदार आम्हाला हवा होता जो गरीब ,वंचित समाजात सहज पोहोचू शकेल काल आमचे हक्काचे आमदार अमित गोरखे माझ्या गरीबाच्या पत्र्याच्या घरात आले भरपूर गप्पा मारल्या चहापाणी घेतले. खोली पावसात गळत होती त्यातही ते येऊन बसले मी आणि माझे कुटुंब धन्य पावलो, आनंद आमचा गगनात मावत नव्हता त्यामुळे मी स्वतःच डफ वाजवून त्यांचं स्वागत केलं, आता त्यांनी माझं कुठलंही काम नाही केलं तरी चालेल ते माझ्या घरी आल्यानंतर माझी समाजातील पत मात्र नक्की वाढली आहे.
आमदार अमित गोरखे यांच्या अनोख्या भेटीची शहरभर चर्चा सुरू आहे .