*
पुणे, दि. ११ : महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्यूलेटरी ॲथोरिटी पुणे यांच्याकडील वसूली आदेशानुसार सॉलिटेअर पाल्म्स व इतर राहणार गट नं. २८६, मोशी, देहू मोशी रोड, बोऱ्हाडेवाडी, ता. हवेली यांच्याकडून २९ लाख ५३ हजार इतकी रक्कम वसुली करण्यासासाठी महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार समपहरण केलेल्या मालमत्तेच्या विक्रीची उदघोषणा व लेखी नोटीस देवून १३ डिसेंबर रोजी जाहीर लिलावाची कार्यवाही रद्द करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे अपर तहसिलदार दिली आहे.
सॉलिटेअर पाल्मस व इतर यांनी महाराष्ट्र रिअल इस्टेट अपिलेट ट्रिब्यूनल मुंबई यांच्या न्यायालयात अपिल दाखल केले असून न्यायालयाच्या २८ नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार महारेरा यांच्याकडील तक्रारीचा आदेश नव्याने निर्णित करण्यासाठी परत पाठविण्यात आला आहे, असेही कळविण्यात आले आहे.