पुणे, 12 डिसेंबर 2023 : इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मटेरियल्स मॅनेजमेंट (आयआयएमएम) पुणे शाखे तर्फे 9 वा वार्षिक सप्लाय चेन मॅनजेमेंट पुरस्कार सोहळा नुकताच कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेल येथे पार पडला. दरवर्षी उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सप्लाय चेन मॅनेजमेंट (एससीएम) मधील सर्वोत्कृष्ट पद्धती, तसेच आरोग्य सेवा संस्थांना पुरस्कार प्रदान केले जातात.
पुरस्कार सोहळ्यात प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मटेरियल्स मॅनेजमेंट (आयआयएमएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष हरिश कुमार शर्मा, राष्ट्रीय सचिव आणि खजिनदार (एनएसटी) सुरेंद्र देवधर,याचबरोबर पुणे शाखेचे अध्यक्ष सुहास गवस, उपाध्यक्ष प्रसाद राव,मानद सचिव अर्जुनसिंग राजपूत,मानद खजिनदार सुहास गारे,पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आणि नॅशनल कौन्सिलर के. आर. नायर,नॅशनल कौन्सिलर व कार्यक्रमाचे समन्वयक टेरेन्स फर्नांडिस, नॅशनल कौन्सिलर मोहन नायर व अमित बोरकर आणि आयआयएमएमपुणे चे माजी अध्यक्ष श्रीपाद कदम आदी मान्यवरांसह पुण्यातील कार्यकारिणी सदस्य आणि पुणे शाखा सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमात आयआयएमएमच्या स्मरणिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले.
वार्षिक पुरस्कार सोहळ्यांमध्ये उत्पादन आणि लॉजिस्टीक क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या सर्वोत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात येते. उत्पादन क्षेत्रातील सुत्ताती इंटरप्रायझेस प्रा. लि. (मध्यम उद्योग) आणि गोदरेज बॉइस (गोदरेज लावकिम मोटर्स) (मोठा उद्योग गट) ला सन्मानित करण्यात आले. लॉजिस्टिक सेक्टर मध्ये एम्आरसी लॉजिस्टिक्स इंडिया प्रा.लि.यांना सर्वोत्तम रोड सर्विस प्रोवाइडर म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शेफलर इंडिया लिमिटेडचे ओम विजयवर्गीय यांना पुरवठा साखळी नेतृत्व उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विषाणूंच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला बेस्ट पब्लिक सेक्टर ऑर्गनाइज़ेशन (सर्वोत्कृष्ट सार्वजनिक क्षेत्रातील संस्था) म्हणून सन्मानित करण्यात आले. इंटीग्रेटेड कॅन्सर रिसर्च एन्ड ट्रीटमेंट सेंटर असलेल्या भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टला सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.एकांश ट्रस्टच्या संस्थापक अनिता अय्यर यांना अनसंग हिरो पुरस्कार प्रदान करण्यात आला,
सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये महिलांनी उमटविला आपला ठसा
सप्लाय चेन मॅनेजमेंट मधील महिलांच्या भूमिकेचा सन्मान करण्यासाठी (संस्थेमध्ये आणि एखाद्या संस्थेत काम करणारी व्यक्ती), पुणे शाखेने सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील महिलांचे योगदान ही नवीन पुरस्कार श्रेणी सुरु केली आहे.
सप्लाय चेन क्षेत्रात महिलांच्या योगदानाकरिता एसक्वायर हेल्थकेअर अॅन्ड लॉजिस्टिक्स प्रा.लि.पुणे (संस्था) आणि जहांगीर हॉस्पिटल पुणेच्या सप्लाय चेन विभागाच्या प्रमुख शर्मिला केसरकर (इंडिविज्युअल) यांना सन्मानित करण्यात आले.
आयआयएमएमच्या पुणे शाखेने नुकतेच आयोजित केलेल्या कायझन कॉम्पिटिशनच्या विजेत्यांना देखील पुरस्कृत करण्यात आले.
आयआयएमएमचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिशकुमार शर्मा यांनी आयआयएमएम पुणे आणि सप्लाय चेन उद्योगात शाखेच्या असलेल्या योगदानाचे कौतुक केले.त्यांनी आयआयएमएम पुणेचे अध्यक्ष सुहास गवस त्याचबरोबर कार्यकारी समितीचे सदस्य अर्जुनसिंग राजपूत,सुहास गारे आणि हर्षल बरडिया यांना प्रेसिडेंटस मेडल देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी स्वागतपर भाषणात आयआयएमएम पुणे चे अध्यक्ष सुहास गवस म्हणाले कि , सहा दशकांचा वारसा असलेली आयआयएमएमच्या ५४ शाखा असून, पुरवठा साखळी व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी व्यक्ती व संस्थांना पुरस्कृत करणारी आयआयएमएम पुणे ही पहिल्या संस्थांपैकी एक आहे.
या कार्यक्रमाकरिता प्रायोजक म्हणून मायलेज लॉजिस्टिक्स प्रा. लि.(डायमंड), एमएएन लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रा.लि.आणि बन्साली मेटॅलॉइज (गोल्ड), एनसाईन्स सॉफ्टवेअर अॅन्ड कम्युनिकेशन्स प्रा.लि.,कॉटमॅक इलेक्ट्रॉनिक्स आणि जेनी ऑटोप्रोडक्ट्स प्रा. लि. (सिल्व्हर), जेनेक्स इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन, अनिल मेटल्स, ट्रांटर इंडिया प्रा. लि.,अश्वनी मेटल्स आणि ईगलबर्गमन इंडिया प्रा.लि (ब्राँझ) यांनी सहकार्य केले.