१२ डिसेंबर २०२३: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज एक्सकॉन २०२३ या दक्षिण आशियामधील प्रमुख बांधकाम उपकरण प्रदर्शनामध्ये भविष्यासाठी सुसज्ज गतीशीलता सोल्यूशन्सच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण व प्रगत श्रेणीचे अनावरण केले. थीम ‘मूव्हिंग इंडिया फॉरवर्ड’शी बांधील राहत कंपनीने देशाला अभिमानाने सेवा देण्यासह नाविन्यता, स्थिरता व सर्वोत्तमतेप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली. टाटा मोटर्सने बांधकाम व पायाभूत सुविधा विभागांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले ट्रक्स व टीपर्स, तसेच हरित इंधनांची शक्ती असलेली वाहने यांच्यासह लिक्विड नॅच्युरल गॅस (एलएनजी) व बॅटरी इलेक्ट्रिकला दाखवले. तसेच कंपनीने अॅग्रीगेट्सच्या व्यापक श्रेणीचे देखील अनावरण केले, ज्यामध्ये औद्योगिक उपकरण, अॅक्सल्स व जेनसेट्ससाठी डिझाइन केलेल्या इंजिन्सचा समावेश आहे.
एक्सकॉन २०२३ येथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या टाटा मोटर्स व्यावसायिक वाहनांची वैशिष्ट्ये:
टाटा मोटर्सकडून एलएनजी-पॉवर्ड व्यावसायिक वाहनांची अग्रणी श्रेणी लाँच
व्यावसायिक स्तरावर Tata Prima 5528.S LNG आणि टाटा प्राइमा 3528.K LNG लाँच करत अग्रस्थानी
✔ प्रदर्शन: बांधकाम क्षेत्रासाठी टाटा मोटर्सचे ई-मोबिलिटी कन्सेप्ट टीपर Tata Prima E.28K
✔ अनावरण: टीपर्सची टॉप-ऑफ-द-लाइन Tata Prima 2830.TK VX आणि Tata Signa 3530.TK VX श्रेणी
टाटा मोटर्सने ट्रक्स व टीपर्सच्या त्यांच्या एलएनजी-पॉवर्ड टाटा प्राइमा श्रेणीच्या व्यावसायिक लाँचसह शाश्वत परिवहनाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले. या अग्रणी उपलब्धीमध्ये टाटा प्राइमा ५५२८.एस एलएनजी आणि भारतातील पहिले एलएनजी-पॉवर्ड टीपर टाटा प्राइमा ३५२८.के एलएनजी यांचा समावेश होता. टाटा मोटर्सने शून्य-उत्सर्जन तंत्रज्ञान सोल्यूशन्सप्रती कंपनीच्या कटिबद्धतेशी बांधील राहत कन्सेप्ट इलेक्ट्रिक टीपर टाटा प्राइमा ई.२८के ला देखील दाखवले. या वाहनांनी शुद्ध ऊर्जा स्रोतांप्रती उद्योगाच्या परिवर्तनामधील मोठ्या उपलब्धीला दाखवले आहे, ज्यामधून टाटा मोटर्सचे २०४५ पर्यंत निव्वळ-शून्य जीएचजी उत्सर्जन संपादित करण्याचे ध्येय अधिक दृढ होते.
तसेच, टाटा मोटर्सने विविध बांधकाम उपयोजनांसाठी डिझाइन केलेले टाटा प्राइमा २८३०.टीके व्हीएक्स व टाटा सिग्ना ३५३०.टीके व्हीएक्स या उच्च कार्यक्षम ट्रक्सच्या लाइन-अपचे देखील अनावरण केले. या वाहनांमध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक ट्रॅक्शन कंट्रोल आणि न्यूमॅटिकली सस्पेंडेड ड्रायव्हर सीट अशी प्रगत वैशिष्ट्ये आहेत, ज्यांचा ऑपरेटर्ससाठी कार्यक्षमता, आरामदायीपणा व सुरक्षितता मानकांमध्ये वाढ करण्याचा मनसुबा आहे. ही वैशिष्ट्ये उद्योगामध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करतात, ज्यामधून नाविन्यता व सुरक्षितता मानकांच्या नवीन युगाचा प्रारंभ होतो.
टाटा मोटर्सच्या एक्सकॉन २०२३ मधील पॅव्हिलियनचे अनावरण करत टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, ”एक्सकॉन २०२३ आमचे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि बांधकाम उद्योगाला सर्वोत्तम सोल्यूशन्स देण्याप्रती अविरत समर्पितता दाखवण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ट्रक्स व टीपर्सच्या एलएनजी-पॉवर्ड श्रेणीच्या लाँचमधून शाश्वत प्रवासाच्या दिशेने वाटचाल करण्यास सज्ज असलेल्या ताफा मालकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करत नाविन्यतेमध्ये अग्रस्थानी राहण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. ग्राहक-केंद्रित कंपनी म्हणून आम्हाला माहित आहे की, ताफा मालक लांब पल्ल्यापर्यंतचे परिवहन आणि पायाभूत सुविधा जसे बांधकाम व खाणकाम यामधील मूल्याला अधिक महत्त्व देतात. आम्ही आमची इलेक्ट्रिक टीपर कन्सेप्ट प्राइमा ई.२८के देखील दाखवली आहे. इलेक्ट्रिक टीपर सादर करण्यासह आम्ही बांधकाम विभागातील इलेक्ट्रिक गतीशीलतेला साह्य करण्यासाठी सर्वांगीण इकोसिस्टम विकसित करू. आमच्या पॅव्हिलियनमध्ये प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलेल्या प्राइमा व सिग्नाचे नवीन व्हीएक्स व्हेरिएण्ट्स सुरक्षितता, उत्पादकता व ड्रायव्हर आरामदायीपणासाठी उद्योगामध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करतात.”
टाटा मोटर्सचा व्यापक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ आहे आणि बीएस-६ फेज २ अनुपालनाचे पालन केले आहे. कंपनीने अधिक वैशिष्ट्ये, कार्यक्षम पॉवरट्रेन्स आणि संपन्न मूल्यवर्धित बदलांसह आपल्या वेईकल्स बंपर-टू-बंपरला अपग्रेड केले आहे. दर्जात्मक टाटा वेईकल्स खरेदी करण्यासह ताफा मालक सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, कमी कार्यसंचालन खर्च, उच्च वेईकल अपटाइम, रिअल-टाइम वेईकल ट्रॅकिंग आणि त्यांचा ताफा कार्यक्षमपणे चालवण्यासाठी अॅनालिटिक्स यांचा आनंद घेऊ शकतात.
टाटा मोटर्स व्यावसायिक वाहनांसोबत त्यांच्या संपूर्ण सेवा २.० उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसमावेशक वेईकल लाइफसायकल व्यवस्थापनासाठी मूल्यवर्धित सेवा मिळतात. ऑपरेटर्सना त्यांच्या वाहनांचा अपटाइम वाढवण्यास व मालकीहक्काचा एकूण खर्च कमी करण्यास सक्षम करणारे टाटा मोटर्सचे सानुकूल ताफा व्यवस्थापनासाठी नेक्स्ट-जनेरशन डिजिटल सोल्यूशन फ्लीट एज आणि भारतभरातील व्यापक सेवा नेटवर्ककडून २४x७ सपोर्टसह टाटा मोटर्सने सर्वांगीण परिवहन सोल्यूशन्समध्ये नवीन बेंचमार्क्स स्थापित करणे सुरू ठेवले आहे.
एक्सकॉन २०२३ येथे टाटा मोटर्स अॅग्रीगेट्सची वैशिष्ट्ये:
विनाव्यत्यय व इकोनॉमिकल कार्यसंचालनांसाठी टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स डिझाइन करण्यात आले
बांधकाम, पायाभूत सुविधा आणि मटेरिअलची हाताळणी करणाऱ्या उद्योगांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या प्रगत सोल्यूशन्सचे प्रदर्शन
✔ टाटा मोटर्स जेनसेट्स: तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत सीपीसीबी IV+ प्रमाणित इंजिनांसह सुसज्ज
✔ टाटा मोटर्स इंडस्ट्रीयल इंजिन्स: त्यांच्या विविधता व टिकाऊपणासाठी ओळखले जातात
✔ टाटा मोटर्स लाइव्ह अॅक्सल्स: उद्योगाच्या विशिष्ट गरजांनुसार डिझाइन करण्यात आले, ज्यामधून विश्वसनीयता व कार्यक्षमतेची खात्री मिळते
✔ टाटा मोटर्स ट्रेलर अॅक्सल्स आणि कम्पोनण्ट्स: विविध उपयोजनांमध्ये उच्च कार्यक्षमतेची खात्री
टाटा मोटर्सने एक्सकॉन २०२३ येथे अॅग्रीगेट्सच्या सर्वसमावेशक श्रेणीचे अनावरण केले, ज्यामधून नाविन्यता व कार्यक्षमतेप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते. यामध्ये २५ केव्हीए ते १२५ केव्हीएपर्यंतचे पॉवर रेंज असलेले इंधन-कार्यक्षम टाटा पॉवर जेनसेट्स, तसेच सीपीसीबी IV+ प्रमाणित इंजिन्स, ५५ ते १३८ एचपी पॉवर नोड्समधील आधुनिक सीईव्ही बीएस-५ इंडस्ट्रीयल इंजिन्स, लाइव्ह अॅक्सल्स यांचा समावेश आहे, जे व्यापक लोड व टॉर्क आवश्यकतांची पूर्तता करतात. तसेच त्यांच्या प्राइम मूव्हर्सशी पूरक ट्रेलर अॅक्सल्स आहेत, यामधून विविध उपयोजनांमध्ये सानुकूल कार्यक्षमतेची खात्री मिळते.
इव्हेण्टमध्ये मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या स्पेअर्स व नॉन-वेईक्युलर बिझनेसचे प्रमुख श्री. विक्रम अग्रवाल म्हणाले, ”आम्हाला अॅग्रीगेट्सची आमची नवीन श्रेणी आणि सीपीसीबी IV+ प्रमाणित इंजिन्सचे अनावरण करण्याचा आनंद होत आहे. एक्सकॉन २०२३ आमच्या ग्राहकांशी संलग्न होण्यासह अॅग्रीगेट्सची जागतिक दर्जाची श्रेणी दाखवण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे. नाविन्यता, विश्वसनीयता व कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत टाटा मोटर्स नवीन बेंचमार्क्स स्थापित करत आहे, तसेच ग्राहकांच्या व्यवसायाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहे. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या ऑफरिंग्ज भारतातील विविध क्षेत्रांमधील उद्योगांना सक्षम करतील, सुलभ व किफायतशीर कार्यसंचालनांची खात्री देतील.”
टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स व जेनसेट्स त्यांची विश्वसनीयता व टिकाऊपणासठी ओळखले जातात आणि शक्तिशाली, पण इकोनॉमिकल कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. विविध कन्फिग्युरेशन्समध्ये भारतभरात उपलब्ध असलेले टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स विविध उपयोजन व क्षेत्रांमधील सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करतात. अॅग्रीगेट्सना प्रबळ रचना, तसेच प्रखर चाचणींचे पाठबळ आहे आणि जागतिक दर्जाच्या सुविधांमध्ये उत्पादित करण्यात आले आहेत.