अभंग वाणीने झाला वृद्धेश्वर सिद्धेश्वर महाशिवरात्र महोत्सवाचा प्रारंभ श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, शिवाजीनगर गावठाण तर्फे आयोजन

तारां कित Avatar

पुणे : ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया’, ‘जय जय विठ्ठल रखुमाई’, ‘देव माझा मी देवाचा’, ‘हीच माझी सत्यवाचना’ अशा एकाहून एक सुंदर आणि स्वर मधुर अभंगवाणीने रसिकांना मंत्रमुग्ध करत श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या महाशिवरात्र संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला.

शिवाजीनगर मधील वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र संगीत महोत्सवाची सुरुवात ह.भ.प. गणेश महाराज भगत आणि सहकार यांच्या अभंग वाणीने झाली. महोत्सवापूर्वी गणेश महाराज भगत यांच्या हस्ते वृद्धेश्वर सिद्धेश्वराची आरती करून महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते यावेळी उपस्थित होते.

‘देवाचिये द्वारी उभा विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया’, ‘सुंदरते ध्यान’, ‘देह देवाचे मंदिर’, ‘विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेमभाव’ अशा भक्तिमय आणि नादपूर्ण अभंगांनी रंगून गेलेल्या महोत्सवामध्ये रसिकांनीही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगांचा आनंद घेतला. ह.भ.प. गणेश महाराज भगत यांच्यासह स्वरा भगत, कल्याणी शेटे आणि अनन्या भगत यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अभय नलगे (हार्मोनियम) आदिनाथ कुटे (तबला), धनंजय वसेकर (पखवाज), अनिल भुजबळ (ताल वाद्य) या कलाकारांनी अतिशय सुरेल साथ संगत केली.

Tagged in :

तारां कित Avatar