जागतिक पातळीवर एआय क्षेत्रात भारताला नेतृत्व करण्याची मोठी संधी * टायकॉन 2025 परिषदेत 700 हून अधिक नवउद्योजकांचा सहभाग

तारां कित Avatar

पुणे 22 फेब्रुवारी 2025 : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारतात असलेली प्रतिभा, कौशल्य,डिजिटल अर्थव्यवस्था, उपलब्ध डेटा आणि विविध क्षेत्रांमध्ये त्याचा वापर, उद्योजकतेची भावना यामुळे जागतिक पातळीवर एआय क्षेत्रात भारताला नेतृत्व करण्याची मोठी संधी आहे. स्टार्टअप्स व नवउद्योजकतेसाठी समर्पित असलेल्या द इंडस आंत्रप्रेन्युअर्स (टीआयई) या ना- नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थे तर्फे हॉटेल वेस्टीन,कोरेगाव पार्क येथे आयोजित केलेल्या टायकॉन 2025 परिषदेत 700 हून अधिक नवउद्योजकांनी सहभाग घेतला.

स्टार्टअप्सना क्रीडा क्षेत्राचे धडे

ट्रीबो या कंपनीचे सहसंस्थापक राहुल चौधरी यांनी ओजीक्यू चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार विरेन रसकीन्हा यांच्याशी संवाद साधला. विरेन रसकीन्हा म्हणाले की, आपल्यापैकी अनेकांना हरण्याची भीती वाटते. पण पराभवाने मला विजयापेक्षा अधिक शिकवले आहे, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अथेन्समधील ऑलिम्पिक उपांत्य फेरीच्या सामन्याचा संदर्भ देत ते म्हणाले, आम्ही परिस्थितीचा दबाव हाताळण्यास शिकलो आणि दबावाखाली कामगिरी करणे शिकलो. खेळात संधी काही सेकंदात येतात आणि जातात आणि त्यामुळे खेळाच्या बाबतीत प्रत्येक पैलूंवर काम करत सातत्याने सुधारणा करत राहिली पाहिजे.

राहुल चौधरी म्हणाले की, क्रीडा क्षेत्र करिअर म्हणून निवडत असतांना नवीन उद्योग सुरू करण्याइतकीच जोखीम असते. धक्के आणि नकार हे उद्योजकांसाठी नेहमीचे अनुभव असतात. लवचिकता आणि परिस्थितीशी लढा देणाऱ्या खेळाडूंकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

अनु आगा यांना ‘स्पिरिट ऑफ टीआयई पुरस्कार’ प्रदान

थरमॅक्सच्या माजी अध्यक्ष अनु आगा यांना उद्योजकता आणि नवोपक्रमातील योगदानाबद्दल ‘स्पिरिट ऑफ टीआयई पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. टीआयई पुणे चे अध्यक्ष श्री.अजय भागवत, टीआयईचे जागतिक विश्वस्त व टायकॉन 2025 परिषदेचे अध्यक्ष श्री.किरण देशपांडे आणि टीआयई बंगळुरूचे माजी अध्यक्ष श्री.नागानंद दोरास्वामी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना अनु आगा म्हणाल्या की, आपल्या देशात अनेक समस्या आहेत.आपण समाजासाठी आणखी कार्य करणे गरजेचे आहे. आपण प्रत्येक जण योगदान देऊ शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे.

टीआयई पुणे चे अध्यक्ष अजय भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.ते म्हणाले की, टीआयई चे 87 चार्टर सदस्य सुमारे 600 सहयोगी सदस्यांना आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी उद्योजकता हा एकमेव मार्ग आहे. त्यांनी टीआयई पुणेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

टीआयईचे जागतिक विश्वस्त व टायकॉन 2025 परिषदेचे अध्यक्ष किरण देशपांडे म्हणाले की, हे उपक्रम पुढे नेत आम्ही पुढच्या पिढीचे उद्योजक घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत

Tagged in :

तारां कित Avatar