गुरूग्राम, भारत, फेब्रुवारी २१, २०२५: सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आपल्या सर्विस सेंटर्सच्या सर्वसमावेशक रिडिझाइनसह स्मार्टफोन ग्राहक सेवा अनुभवाला उत्साहित करण्यास सज्ज आहे. या उपक्रमाचा विनासायास सर्विस-टू-सेल्स प्रवासाचा आनंद देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे प्रीमियम कस्टमर केअरवरील प्रबळ फोकससह उच्च दर्जाच्या विक्री-पश्चात्त सपोर्टप्रती सॅमसंगची कटिबद्धता अधिक दृढ होईल.
एकीकृत ओम्नी-चॅनेल अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या रिमॉडेल सर्विस सेंटर्समध्ये प्रगत डिजिटलाइज प्रक्रियांचा समावेश आहे, ज्या सॅमसंगच्या तरूण व डायनॅमिक ग्राहकवर्गाच्या सर्वसमावेशक अपेक्षांची पूर्तता करतात. या सेंटर्समध्ये वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ आहे, तसेच अधिक अचूकतेसह समस्यांना ओळखणाऱ्या प्रगत डायग्नोस्टिक टूल्ससह तंत्रज्ञान नाविन्यतेमध्ये अग्रस्थानी आहेत.
अपग्रेडेड सेंटर्स समकालीन लेआऊट्सना दूर करत उत्साहवर्धक, सोफा-स्टाइल आसन व्यवस्था देतात. या सेंटर्समध्ये इन-बिल्ट वायरलेस चार्जिंग स्टेशन्स आहेत, जे लाऊंज-सारख्या वातावरणाची निर्मिती करतात. नवीन रूप देण्यात आलेल्या अॅक्सेसरी वॉल्समधून सॅमसंगची वीअरेबल्सची व्यापक श्रेणी दिसून येते, तर अल्ट्रा-लार्ज डिजिटल स्क्रिन्समध्ये आधुनिक उत्पादन नाविन्यतांचा समावेश आहे, जे अभ्यागतांना सर्वोत्तम अनुभव देतात.
”दशकांपासून आम्ही ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी सर्विस सेंटर्सचा प्रबळ नेटवर्क विस्तारित केला आहे, जेथे आमच्या विक्री सहयोगींच्या गरजांची देखील पूर्तता केली जाते. ग्राहकांच्या अपेक्षा दररोज वाढत असताना आमची या सेंटर्समध्ये उत्साही व कार्यक्षम डिझाइन घटकांची भर करत त्यांच्यामध्ये कायापालट करण्याची आणि समकालीन ग्राहकांच्या गरजा लक्षात ठेवत सेंटर्सना अधिक लक्षवेधक करण्याची इच्छा होती. या सेंटर्सची खासियत म्हणजे ग्राहकांना प्रीमियम अनुभव देण्याप्रती सॅमसंगची कटिबद्धता,” असे सॅमसंग इंडियाच्या कस्टमर सॅटिस्फॅक्शनचे उपाध्यक्ष सुनिल कुटिन्हा म्हणाले.
ग्राहक इंटरअॅक्शन्स वाढवण्यासाठी समर्पित किओस्क्स अभ्यागतांना उत्पादन सपोर्ट स्पेशालिस्ट्ससोबत कनेक्ट होण्यास, नवीन उत्पादन लाँचेसना एक्स्प्लोअर करण्यास आणि विशेष ऑफर्स व सूटबाबत अपडेटेड राहण्यास सक्षम करतील. ऑनलाइन अपॉइण्टमेंट बुकिंग सिस्टम ग्राहकांना अगोदर त्यांच्या भेटींचे नियोजन करण्याची सुविधा देईल, ज्यामधून किमान प्रतिक्षा वेळेसह विनासायास अनुभवाची खात्री मिळेल.
सॅमसंग सध्या भारतभरात ३,००० हून अधिक सर्विस टचपॉइण्ट्ससह फिजिकल सर्विस सेंटर्स, निवासी इंजीनिअर्स व कलेक्शन पॉइण्ट्सचे कार्यसंचालन पाहते. प्रमुख शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने रिडिझाइन केलेले सर्विस सेंटर्स लाँच करण्यात येतील, ज्यामधून देशभरातील ग्राहकांना उत्साहित अनुभव मिळेल.