क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर याने नेत्र आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एका मोठ्या नवीन कॅम्पेनकरिता डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलशी भागीदारी केली आहे
दोन दशकांहून अधिक काळ, सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूला मानवंदना म्हणून हे रुग्णालय दरवर्षी 100 मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करत आहे
पुणे, २२ फेब्रुवारी २०२५: मोटरसायकल प्रेमींना प्रीमियम आणि रोमांचक अनुभव देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) यांनी बाणेर, पुणे (महाराष्ट्र) येथे फेब्रुवारी 2025: सुमारे 67 वर्षांचा वारसा आणि जागतिक स्तरावर 223 रुग्णालये असलेली भारतातील सर्वात मोठी नेत्र रुग्णालय साखळी असलेल्या डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलने सचिन तेंडुलकर यांना आपला नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. गेल्या 21 वर्षांपासून, हे रुग्णालय त्याच्या ‘100 सेंच्युअरी, 100 पेशंटस्’ प्रोग्रामतंर्गत दरवर्षी 100 रुग्णांवर मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करत आहे. क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूला मानवंदना म्हणून वर्षभरात जवळपास 2 लाख शस्त्रक्रिया करण्यात येतात. याशिवाय वर्षाला 2 मिलियन रुग्णांना हे हॉस्पिटल सेवा देते आहे.
या सहकार्याची सुरुवात दोन दूरचित्रवाणी जाहिरातींपासून झाली, ज्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या जाहिरातीत सचिनचा मोठा चाहता चेहऱ्याच्या एकसारख्या ठेवणीमुळे त्याला गोंधळात टाकतो. खरा सचिन पुढे येतो आणि चाहत्याचा दिवस साजरा होतो. दुसऱ्या जाहिरातीमध्ये, ‘द मास्टर ब्लास्टर’ ची जोडी ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्रा सोबत आहे, ग्लेन-सचिनच्या उपस्थितीमुळे क्रिकेट चाहत्यांच्या 1990च्या दशकातील जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
या सहकार्याबद्दल बोलताना डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचे चेअरमन प्रा. डॉ. अमर अगरवाल म्हणाले, “सचिन तेंडुलकर याने आमचा ब्रँड अॅम्बेसेडर असणे हा आमचा सन्मान आहे. त्यांच्या सहकार्याने डोळ्यांची काळजी घेण्याच्या आमच्या उत्कृष्ट प्रवासाचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. दोन दशकांहून अधिक काळ, आमचे रुग्णालय त्यांना मानवंदना म्हणून दरवर्षी 100 मोफत नेत्र शस्त्रक्रिया करत आहे. तब्बल 100 शतके झळकावणारा एकमेव खेळाडू म्हणून क्रिकेटमधील त्याचा अतुलनीय वारसा, एका वेळी एक रुग्ण, आरोग्यसेवेतील सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे. आम्ही जागतिक दर्जाची डोळ्यांची काळजी प्रदान करण्यासाठी आणि प्रत्येकासाठी नियमित डोळ्यांच्या तपासणीद्वारे डोळ्यांच्या चांगल्या आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
या भागीदारीबद्दल आपल्या टिप्पणींमध्ये सचिन तेंडुलकर म्हणाले, “पुन्हा एकदा डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलसोबत काम करताना मला आनंद होत आहे. मला अनेक वर्षांपूर्वी, बंगलोरमध्ये त्यांच्या सुविधेचे उद्घाटन करण्याचा सन्मान मिळाला होता. जिथे या टीमने गरजूंना मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचे वचन दिले होते. आपण या संघटनेसह पूर्ण वर्तुळात आलो आहोत. मला टेलिव्हिजन कर्मशियलचे चित्रीकरण करताना खरोखर आनंद झाला. प्रत्येकाकडून त्यांचे कौतुक होत आहे हे पाहून खूष आहे. आम्ही एकत्रितपणे भारत आणि जगभरात डोळ्यांची देखभाल घेण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी उत्सुक आहोत.”
==============================