ग्रोमॅक्स ॲग्री इक्विपमेंटने महिंद्रा अँड महिंद्रा लि. आणि गुजरात सरकार यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत पूर्ण केली २५ वर्षे

तारां कित Avatar

2WD आणि 4WD विभागात 5 नवे ट्रॅक्टर मॉडेल्स सादर केले, तसेच केशरी आणि काळ्या रंगाच्या थीममध्ये नवीन ट्रॅक्टर सादर केले.

मुंबई, फेब्रुवारी 25, 2025: ग्रोमॅक्स ॲग्री इक्विपमेंट लिमिटेड (पूर्वीचे महिंद्रा गुजरात ट्रॅक्टर लि.), हा महिंद्रा अँड महिंद्रा लि. आणि गुजरात सरकार यांचा संयुक्त उपक्रम असून, कंपनी आपल्या 25व्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा करत आहे. हा टप्पा भारतीय शेतकऱ्यांना परवडणाऱ्या यांत्रिक शेती उपायांनी सक्षम करण्याच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे.

1999 मध्ये महिंद्राने कंपनीतील प्रमुख हिस्सेदारी संपादन केली होती. त्याचे नामकरण महिंद्रा गुजरात ट्रॅक्टर लि. असे करण्यात आले आणि 2017 मध्ये ग्रोमॅक्स ॲग्री इक्विपमेंट लि. म्हणून नामकरण करण्यात आले. यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण यांत्रिकीकरण उपाय उपलब्ध करण्याच्या दिशेने कंपनीने धोरणात्मक परिवर्तन केले. गेल्या 25 वर्षांत ग्रोमॅक्सने आपली ट्रॅक्टर श्रेणी केवळ 4 मॉडेल्सवरून 20-50 HP विभागात 40 हून अधिक व्हेरिएंट्सपर्यंत विस्तारली आहे. यामध्ये 2017 मध्ये लाँच केलेले TRAKSTAR आणि HINDUSTAN ब्रँडअंतर्गत ट्रॅक्टर्स, तसेच TRAKMATE ब्रँडअंतर्गत विविध शेती उपकरणांचा समावेश आहे.

कंपनीच्या २५व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, ग्रोमॅक्सने नवीन 4WD ट्रॅक्टर मॉडेल्स – Trakstar 525 आणि Trakstar 536 लाँच केली आहेत. याशिवाय, 24HP, 31HP आणि 36HP क्षमतेच्या नवीन 2WD ट्रॅक्टर व्हेरिएंट्स सादर केले असून, विशेषतः फळबाग शेतीसाठी (orchard segment) योग्य पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, तसेच तरुण शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि ट्रॅक्टर बाजारात वेगळेपण निर्माण करण्यासाठी, ग्रोमॅक्सने केशरी आणि काळ्या रंगातील ट्रॅक्टर्सही सादर केले आहेत.

ग्रोमॅक्सच्या २५ वर्षांच्या प्रवासावर भाष्य करताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष, श्री. हेमंत सिक्का म्हणाले की, “महिंद्रा अँड महिंद्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि ग्रोमॅक्सच्या 25 वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. ‘शेतीत बदल घडविणे आणि जीवन समृद्ध करणे’ या आमच्या सामाईक वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे. ग्रोमॅक्स हा असा ब्रँड आहे, जो देशातील शेतकऱ्यांना उत्तम, परवडणारी आणि सहज उपलब्ध शेती उपकरणे पुरवण्यासाठी समर्पित आहे. या प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांचे, भागीदारांचे, गुजरात सरकारचे आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पुढील वाढीच्या पर्वात, आम्ही ग्रोमॅक्ससोबत भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांचे यांत्रिकीकरण करण्यास आणखी सक्षम करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक आहोत.”

ग्रोमॅक्स ॲग्री इक्विपमेंट लि. ही महिंद्रा अँड महिंद्रा लि. आणि गुजरात सरकार यांची संयुक्त मालकीची कंपनी असून, 60:40 या इक्विटी गुणोत्तराने भागीदारी आहे. कंपनीचा उत्पादन प्रकल्प वडोदरा, गुजरात येथे स्थित आहे.

Tagged in :

तारां कित Avatar