पुणे,२५ फेब्रुवारी: झोनल जलतरण स्पर्धेत नांदे येथील, ध्रुव ग्लोबल स्कूलच्या हिया कोटक, निया पतंगे आणि अनया वानखेडे यांनी बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक आणि फ्री स्टाइल खेळामध्ये आपली चपळता आणि चमक दाखवित पदके आपल्या नावे केली.
शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील जलतरण तलावात नुकतीच झोनल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाली. येथे खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखविली आहे. शाळेतील जलतरणपटूंना संधी देणे हे त्यांचे एकमेव उद्देश्य या स्पर्धेचा आहे.
या स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रतिभावन जलतरणपटूनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये हिया कोटक (२०० मीटर बटरफ्लाय – तृतीय), निया पतंगे (१०० मी. बॅकस्ट्रोक- तृतीय ) व (२०० मी. फ्री स्टाइल – तृतीय ) आणि अनया वानखेडे (२०० मी. बॅकस्ट्रोक – तृतीय ) स्थान पटकावून शाळेचे नाव मोठे केले.
ही स्पर्धा फ्रीस्टाइल, बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, वैयक्तिक मेडली, फ्रीस्टाइल रिले आणि १००, २०० मीटरपेक्षा जास्त मिडले रिलेत संपन्न झाली.
या संदर्भात ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी सर्व विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.
यशवर्धन मालपाणी म्हणाले, या चॅम्पियनशिपचे उद्दिष्टे शाळेतील जलतरण प्रतिभांना संधी उपलब्ध करून देणे आहे. या खेळाडूंची चपळता आणि मेहनत ही नक्कीच त्यांना यशाच्या शिखरावर पोहचवेल.
संगीता राऊतजी म्हणाल्या, विद्यार्थी खेळाडूंच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचा अविश्वसनीय अभिमान आहे. यांनी असेच यश मिळवित राहिले तर आमच्या युवा चॅम्पियन्सचे भविष्य उज्वल आहे. आमच्या समर्पित प्रशिक्षकांचे मनःपूर्वक आभार
या खेळाडूंना स्मिता काटवे, केशव हजारे, उमा जोशी, रूपाली अनाप यांनी अखंड पाठिंबा आणि मार्गदर्शन दिले.
ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे.
झोनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये ध्रुवच्या खेळाडूंची चमक चपळता आणि प्रतिभेच्या जोरावर तीन पदकांवर नाव कोरले
Share with
Tagged in :