मुथूट मायक्रोफिन लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार १८ डिसेंबर २०२३ पासून होणार सुरू · प्रत्येकी १० रुपये (“इक्विटी शेअर”) दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी २७७ रुपये ते २९१ रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित. · बोली/ऑफर सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि बुधवार २० डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ असेल · बोली किमान ५१ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५१ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल · आरएचपी लिंक: https://jmfl.com/Common/getFile/2875

तारां कित Avatar

मुंबई, १३ डिसेंबर २०२३: मुथूट मायक्रोफिन लिमिटेड (“कंपनी”)ची प्राथमिक समभाग विक्री १० रुपये (“इक्विटी शेअर”) दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्ससाठी सोमवार १८ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे.

प्रमुख गुंतवणूकदार बोलीची तारीख शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ असेल. ऑफर सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि बुधवार २० डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल.

प्रति इक्विटी शेअरसाठी २७७ रुपये ते २९१ रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान ५१ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५१ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

कंपनीचा प्राथमिक समभाग विक्रीतून ९,६०० दशलक्ष रु. (९६० कोटी रु.) पर्यंतच्या एकूण ऑफर साइजसह निधी उभारण्याचा मानस आहे. एकूण ऑफर आकारात ७,६०० दशलक्ष रु. (७६० कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि विक्री समभागधारकांकडून २,००० दशलक्ष रु. (२०० कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफरचा समावेश आहे.

कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा विनियोग कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

विक्रीच्या ऑफरमध्ये थॉमस जॉन मुथूट यांच्या द्वारे १६३.६३ दशलक्ष रु. (१६.३६ कोटी रु.), थॉमस मुथूट यांच्या द्वारे १६३.८४ दशलक्ष रु. (१६.३८ कोटी रु.), थॉमस जॉर्ज मुथूट यांच्या द्वारे १६३.६१ दशलक्ष रु. (१६.३६ कोटी रु.), प्रीती जॉन मुथूट यांच्या द्वारे ३३७.३९ दशलक्ष रु. (३३.७४ कोटी रु.), रेमी थॉमस यांच्या द्वारे ३३३.८७ दशलक्ष रु. (३३.३९ कोटी रु.), नीना जॉर्ज यांच्या द्वारे ३३७.६६ दशलक्ष रु. (३३.७७ कोटी रु.) (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) आणि ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल डब्ल्यूआयव्ही लिमिटेड यांच्या द्वारे ५०० दशलक्ष रु. (५० कोटी रु.) (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

११ डिसेंबर २०२३ च्या (“RHP”) या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स मुंबई येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, महाराष्ट्र (“RoC”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स स्टॉक एक्सचेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफरच्या उद्देशासाठी नियुक्त स्टॉक एक्सचेंज हे बीएसई असेल.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम ३१ सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(१) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून सेबी आयसीडीआर नियामकांच्या ३२ (१) निर्देशांनुसार त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी

Tagged in :

तारां कित Avatar