पुणे, 14 डिसेंबर २०२३ : कवयित्री आणि क्रिएटिव्ह फॅसिलिटेटर श्रिया प्रधान यांच्या तर्फे विविध कला प्रकारांमधून कविता सादर करण्याच्या ‘ब्रेकिंग पॅटर्न शो’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी श्रिया यांनी आपल्या १२ विविध कविता इतर १२ विविध कलाप्रकारांमध्ये सादर करण्यासाठी कलाकारांसोबत सहयोग केला आहे. प्रत्येक सहयोगी कलाकाराकडे श्रियाने लिहिलेली एक कविता असेल आणि जी त्यांच्या कलेतून सादर केली जाणार आहे. या कला प्रकारांमध्ये कॅलिग्राफी, नृत्य, संगीत, चित्रकला, एम्ब्रॉयडरी, कुंभारकाम, फॅब्रिक आर्ट , पाककला,कँडल आर्ट, अॅनिमेशन, चित्रकला कलाकार यांचा समावेश आहे. ब्रेकिंग पॅटर्न शो 17 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 8 या वेळेत कलाछाया कल्चरल सेंटर, एसबी रोड येथे होणार आहे.
श्रिया प्रधान यांचा सर्जनशील कार्यक्रम हा एका परिवर्तनीय अनुभवाची कल्पना असून यामध्ये असंख्य कला प्रकारांमध्ये कवितेला केंद्रस्थानी केले आहे.या कार्यक्रमातून कवितेला कसे समजले जाते याचा परंपरागत साचा बदलला जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत बोलताना श्रिया प्रधान म्हणाल्या कि, कविता केवळ पेन आणि कागदावर मर्यादित नाही;तर आपल्या दैनंदिन जीवनात अंतर्भूत असते.
त्या पुढे म्हणाल्या की, हे केवळ कला प्रदर्शन नाही; तर हा शब्द आणि विविध कला प्रकारांमधील संवाद आहे. कवितेचा माहित नसलेला पैलू उलगडण्याचा आणि त्यांना जिवंत करण्याचा माझा प्रयत्न आहे.
जिथे कविता केवळ वाचली जात नाही तर अनुभवली जाते, जिथे प्रेक्षक कलात्मक संभाषणाचा सक्रिय भाग होतील,अशी एक रोमांचक जागा प्रदान करण्याचा श्रियाचा हेतू आहे.ब्रेकिंग पॅटर्न्स शो द्वारे कवितेला पारंपरिक सीमा मुक्त करून केंद्रस्थानी आणण्याचा माझा प्रयत्न आहे.