इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या जनजागृतीसाठी फिरत्या रथाचा शुभारंभ*

तारां कित Avatar

*
पुणे, दि. १४ : आगामी लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जनजागृती आणि प्रात्याक्षिक करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्वीप समन्व्यक तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विवेक जाधव, मतदार यादी समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, सहाय्यक संचालक देवराम शेळके, तहसीलदार शीतल मुळे आदी उपस्थित होते.

प्रत्येक मतदारसंघात २ वाहने याप्रमाणे २१ मतदार संघात ४२ फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघातील ४ कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचे मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते प्रशिक्षक आपापल्या मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्याक्षिके करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राअंतर्गत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, मॉल इत्यादी ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत नागरिकांचे अभिप्राय घेण्यात येणार असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी ईव्हीएम यंत्राच्या प्रात्याक्षिकाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे केले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar