पुणे,7 ऑक्टोबर 2025 :
ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार सोबत आपली भागीदारी सलग तिसऱ्या वर्षी सुरू ठेवली आहे.हे वर्ष खास आहे,कारण ह्युंडाई क्रेटा भारतात 10 वर्षे पूर्ण करीत आहे. 2015 मध्ये सादर झालेल्या क्रेटा ने भारतातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये परिवर्तन घडवले असून डिझाईन,कार्यक्षमता आणि ग्राहक समाधानासाठी मापदंड म्हणून बघितले जाते.