एसएसपीयूचा जागतिक विस्तार | जर्मनीतील सीबीएस इंटरनॅशनल बिझनेस स्कूलसोबत सामंजस्य करार

तारां कित Avatar

पुणे, 7 ऑक्टोबर 2025 – सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणे यांनी युरोपातील अग्रगण्य बिझनेस स्कूलपैकी एक असलेल्या सीबीएस इंटरनॅशनल बिझनेस स्कूल, जर्मनी सोबत सामंजस्य करार (MoU) व विद्यार्थी विनिमय करार (Student Exchange Agreement) करून आपल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विस्तार केला आहे.

 

ही भागीदारी एसएसपीयूच्या जागतिक दर्जाच्या, कौशल्याधारित, उद्योगाभिमुख आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण केंद्र होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

या कराराद्वारे एसएसपीयूने जगभरातील विद्यार्थ्यांसाठी “ग्लोबल लर्निंग आणि अप्लाईड एज्युकेशन” यांचा संगम असलेले एक आकर्षक शिक्षण केंद्र म्हणून आपले स्थान अधिक बळकट केले आहे.

 

या सहकार्यांतर्गत खालील उपक्रम राबविण्यात येतील:

 

विद्यार्थी विनिमय कार्यक्रम – प्रत्येक सत्रात चार विद्यार्थी (किंवा पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी दोन विद्यार्थी) विनिमय कार्यक्रमात सहभागी होतील. सीबीएसचे विद्यार्थी एसएसपीयूच्या अत्याधुनिक सुविधा, आंतरशाखीय अभ्यासक्रम आणि अनुभवाधारित शिक्षण प्रणालीचा लाभ घेतील, तर एसएसपीयूचे विद्यार्थी सीबीएसमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि संस्कृतीचा अनुभव घेतील.

 

प्राध्यापक विनिमय व विकास कार्यक्रम – दोन्ही विद्यापीठांतील प्राध्यापक अध्यापन, संयुक्त संशोधन आणि अकादमिक प्रकल्पांमध्ये सहभागी होतील, ज्यामुळे विचारांची देवाणघेवाण आणि तज्ज्ञतेचा आदानप्रदान वाढेल.

 

प्रगती मार्ग (Progression Pathways) – एसएसपीयूचे विद्यार्थी सीबीएसमधील पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये थेट प्रवेश घेऊ शकतील, ज्यामुळे जागतिक शैक्षणिक प्रवासासाठी अखंड मार्ग उपलब्ध होईल.

 

संयुक्त शैक्षणिक व संशोधन उपक्रम – दोन्ही संस्था मिळून संयुक्त अभ्यासक्रम, दुहेरी पदवी (Double Degree) पर्याय, एक्झिक्युटिव्ह शिक्षण कार्यक्रम तसेच संशोधन प्रकल्प विकसित करतील.

 

एसएसपीयूच्या विद्यार्थ्यांची पहिला बॅच मार्च २०२६ पासून या विनिमय कार्यक्रमात सहभागी होणार आहे — ज्यामध्ये शैक्षणिक उत्कृष्टता, सांस्कृतिक अनुभव आणि जागतिक प्रत्यक्ष शिक्षणाचा संगम होईल.

 

“ही भागीदारी एसएसपीयूच्या जागतिक स्तरावर उपयुक्त आणि कौशल्याधारित शिक्षण देण्याच्या दृष्टीला अधिक बळकट करते. अशा प्रकारच्या सहकार्यांमुळे केवळ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव समृद्ध होत नाही, तर आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी आणि सांस्कृतिक आदानप्रदानासाठीही नवे मार्ग खुलतात.”— डॉ. स्वाती मुझुमदार, प्रो-चॅन्सलर, एसएसपीयू

 

 

Tagged in :

तारां कित Avatar