सीआयआय तर्फे नेक्सजेन मोबिलिटी शो 2025 चे पुण्यात आयोजन

तारां कित Avatar

पुणे,7 ऑक्टोबर 2025 : द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय),पश्चिम विभाग तर्फे मोशी मधील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे 9 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान वाहन उद्योगासाठी नेक्सजेन मोबिलिटी शो 2025 या प्रदर्शन व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हे या एक्स्पोचे तिसरे वर्ष आहे.

 

सीआयआय पश्चिम विभागाच्या फ्युचर मोबिलिटी टास्क फोर्सचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि. चे उपाध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले की, इनोव्हेट.इंटिग्रेट.इम्पॅक्ट : द फ्युचर ऑफ मोबिलिटी या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम वाहन उद्योगातील संपूर्ण मूल्यसाखळीला एकत्रित आणेल. यामध्ये व्यावसायिक वाहने,प्रवासी वाहने,धोरण आणि नियामक मार्गदर्शक तत्वे, ईव्ही व्यवसाय परिसंस्था विकास, शाश्वत चार्जिंग पायाभूत सुविधा, बॅटरी तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह आफ्टर मार्केट, ऑटोमोटिव्ह मटेरियल्स, ऑटोमोटिव्ह लॉजिस्टिक्स, ईव्ही उत्पादन अभिनवता व गुंतवणूक, रॅपिड मेट्रो,हाय स्पीड ट्रेन्स,शहरी हवाई गतीशीलता आणि पायाभूत सुविधा विकास यासारख्या विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करतील.

 

संशोधन विकास,अभिनवता व डिजिटलायझेशन विषयासाठी सीआयआयच्या पश्चिम विभागाच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष व सीआयआय पश्चिम विभागाच्या फ्युचर मोबिलिटी टास्क फोर्सचे सहअध्यक्ष आणि झेडएफ समुहाचे अध्यक्ष आकाश पास्सी म्हणाले की,या उपक्रमामुळे पुण्यातील व पश्चिम भारतातील व्यावसायिकांना अद्ययावत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळविण्याची तसेच मोबिलिटी सोल्युशन्सला आकार देणाऱ्या उद्योग नेतृत्वाशी संवाद साधण्याची संधी मिळेल.

 

सीआयआय पुणे झोनल कौन्सिलचे अध्यक्ष आणि आरएसबी ट्रान्समिशन्स इंडिया लि.चे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा म्हणाले की,भारतीय वाहन उद्योग आता अतिशय रोमांचक वळणावर असून भविष्याला आकार देणारे अनेक प्रवाह दिसून येत आहेत,त्यामुळेच नेक्सजेन मोबिलिटी शो हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.

 

या उपक्रमात जागतिक दर्जाचे ऑटोमोबाईल ब्रँड आणि उद्योगातील भागधारकांचा समावेश असेल. यामध्ये इंटर्नल कंबशन इंजिन्स (आयसीई),इलेक्ट्रिक,हायब्रिड,सीएनजी/एलएनजी व इथेनॉल/बायोफ्युएल पॉवर ट्रेन्स, इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक सबसिस्टीम्स,मेकॅनिकल सबसिस्टीम्स ,पारंपारिक व अद्ययावत ऑटोकंपोनंटस आणि मोबिलिटीच्या भविष्याला चालना देणारे नवीन ऑटोमोबाईल तंत्रज्ञान कल प्रदर्शित केले जातील.

 

संशोधन विकास,अभिनवता व डिजिटलायझेशन विषयासाठी सीआयआयच्या पश्चिम विभागाच्या टास्क फोर्सचे सहअध्यक्ष,वरिष्ठ सल्लागार आणि आनंद ऑटोमोटिव्ह प्रा.लि.च्या अभिनवता व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख एमएस शंकर म्हणाले की, विविध विषयांवरील तज्ञांची सत्रे व महत्त्वपूर्ण चर्चांद्वारे या कार्यकमाचे उद्दिष्ट सहकार्याला चालना देणे आणि अधिक शाश्वत व कनेक्टेड ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या दिशेने प्रगतीला प्रोत्साहन देणे हे आहे.

 

ठळक वैशिष्ट्ये :

 

9 ऑक्टोबर 2025 रोजी सीआयआय ऑटोमोटिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह 2025, 10 ऑक्टोबर 2025 रोजी सीआयआय सॉफ्टवेअर आधारित मोबिलिटी कॉन्क्लेव्ह 2025 आणि 11 ऑक्टोबर रोजी एआरएआय – एएमटीआयएफ नवीग्यान या स्टार्टअप व इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar