फोर्स मोटर्सकडून संपूर्ण उत्‍पादन श्रेणीमध्‍ये तीन वर्षांचे पूरक रोडसाइड असिस्‍टण्‍स लाँच

तारां कित Avatar

भारतातील व्‍यावसायिक वाहन विभागातील हा अद्वितीय उपक्रम ग्राहक सोयीसुविधा, विश्वसनीयता आणि केअरप्रती कंपनीच्‍या कटिबद्धतेला दृढ करतो

 

 

 

पुणे, ७ ऑक्‍टोबर २०२५: फोर्स मोटर्स लिमिटेड ही प्रमुख ऑटोमोटिव्‍ह कंपनी आणि भारतातील सर्वात मोठ्या व्‍हॅन उत्‍पादक कंपनीने आपल्‍या सर्वसमावेशक रोडसाइड असिस्‍टण्‍स (आरएसए) उपक्रमाच्‍या लाँचची घोषणा केली आहे. कंपनीने आता आपली सर्व उत्‍पादन श्रेणी जसे ट्रॅव्‍हलर, ट्रॅक्‍स, मोनोबस, अर्बनिया आणि गुरखा या वेईकल्‍सवर तीन वर्षांचे पूरक रोडसाइड असिस्‍टण्‍स सेवा सादर केली आहे.

 

भारतातील व्‍यावसायिक वाहन श्रेणीमधील हा अद्वितीय उपक्रम फोर्स मोटर्सचा मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती आणि संपूर्ण भारतात दिवस-रात्र ग्राहकांना साह्य करण्‍याप्रती सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांचा भाग आहे. या उपक्रमामध्‍ये ब्रेकडाऊन सपोर्ट व अपघातासंदर्भात साह्यापासून टोईंग व ऑन-साइट रिपेअर्सपर्यंत अनेक सेवांचा समावेश आहे, ज्‍यांचा डाऊनटाइम कमी करण्‍याचा आणि प्रत्‍येक ग्राहकाला समाधान देण्‍याचा मनसुबा आहे.

 

”आमचे ग्राहक दररोज फोर्स वेईकल्‍सवर विश्वास ठेवतात आणि हा विश्वास सार्थ ठरवणे ही आमची जबाबदारी आहे,” असे फोर्स मोटर्सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्‍हणले. ”तीन वर्षांच्‍या पूरक रोडसाइड असिस्‍टण्‍स उपक्रमासह आमचा त्‍यांच्‍या प्रवासादरम्‍यान संपूर्ण साह्य करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यासह विश्वसनीयता, प्रतिसाद आणि केअरप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. हा उपक्रम उत्‍साहपूर्ण मालकीहक्‍क अनुभव देण्‍यामध्‍ये आणि विश्वासार्ह सेवेच्‍या माध्‍यमातून दीर्घकालीन विश्वास निर्माण करण्‍यामध्‍ये आमच्‍या सातत्‍यपूर्ण गुंतवणूकीमधील आणखी एक महत्त्वाचा टप्‍पा आहे.”

 

फोर्स मोटर्स रोडसाइड असिस्‍टण्‍सची प्रमुख वैशिष्‍ट्ये:

 

· वेईकल खरेदी केल्‍याच्‍या तारखेपासून ३ वर्षांसाठी पूरक कव्‍हरेज.

 

· २४x७ टोल-फ्री हेल्‍पलाइन, विविध भाषांमध्‍ये वर्षभर ३६५ दिवस उपलब्‍ध.

 

· जवळपास १०० किमी अंतरावरील जवळच्‍या अधिकृत फोर्स वर्कशॉपपर्यंत मोफत टोईंग सेवा.

 

· किरकोळ मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल समस्‍यांसाठी ऑन-साइट रिपेअर सपोर्ट.

 

· अपघातामध्‍ये साह्य, ज्‍यामध्‍ये वेईकल रिकव्‍हरी आणि वर्कशॉप्‍ससोबत समन्‍वयाचा समावेश.

 

· टायर बदलणे, बॅटरी जम्‍प-स्‍टार्ट आणि कीजशी संबंधित साह्य.

 

· आपत्‍कालीन समन्‍वय सेवा, जसे मेसेज रिले, कॉन्‍फरन्‍स कॉलिंग आणि जवळच्‍या वर्कशॉपकडे घेऊन जाणे.

 

· अतिरिक्‍त सोयीसुविधा फायदे, जसे कायदेशीर व मेडिकल रेफरल्‍स, हॉटेल किंवा टॅक्‍सीशी संपर्क आणि विलंब झाल्‍यास वाहन ताब्‍यात घेण्‍यास मदत.

 

देशभरात सहयोगी नेटवर्कचे पाठबळ आहे, ज्‍यामुळे संपूर्ण भारतात त्‍वरित व व्‍यावसायिक साह्यतेची खात्री मिळते. आरएसए उपक्रम विश्वसनीयता, सर्विस उपलब्‍धता आणि मालकीहक्‍काचा एकूण खर्च कमी करण्‍यावरील फोर्स मोटर्सचा फोकस अधिक दृढ करतो.

 

 

Tagged in :

तारां कित Avatar