पुणे,
आपल्या देशातील व्यवस्था दर्शवणारी तीन नाटके मला करता आली. कोणती व्यवस्था कुठे वळते आणि काय करते हे नेमकेपणाने दाखवता आले. राजकारणात कोणावर लक्ष्य ठेवून गळ लावला जातो हे दिसून येते.१९७५ साली “सामना” चित्रपट लेखन विजय तेंडुलकर यांनी केले आणि त्या चित्रपटाची निर्मिती झाली. “मारुती कांबळेचे काय झाले” पात्र त्यावेळी खूप प्रसिद्ध झाले. काळाचे संदर्भानुसार दलीत राजकारण आता बदलले आहे. देश स्वातंत्र्य करण्यास महात्मा गांधी यांनी प्रचंड कष्ट घेतले आहे. एका अंगावरील कपड्यावर त्यांनी प्रचंड ब्रिटिश सत्ता विरोधात लढा दिला ही असामान्य बाब आहे. नंतर जन्मलेल्या लोकांनी त्यांनी स्वातंत्र्य कसे मिळवले हे विचारणे योग्य नाही असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे ” राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन गांधी भवन कोथरूड याठिकाणी करण्यात आले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे, गांधी समितीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी,साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसाठ , डॉ.शिवाजी कदम, लक्ष्मीकांत देशमुख, सचिव अन्वर राजन , डॉ.एम एस जाधव, स्वप्नील तोंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. याप्रसंगी विनोद शिरसाठ यांनी डॉ.जब्बार पटेल आणि डॉ.मोहन आगाशे यांची मुलाखत घेतली.
डॉ.जब्बार पटेल म्हणाले, माझे वडील रेल्वे मध्ये गार्ड म्हणून काम करत होते. सोलापूर सारख्या ठिकाणी घरात कोणती संगीत पार्श्वभूमी नव्हती. मात्र, घरासमोर गणपती उत्सव साजरा होत. त्याठिकाणी एका नाटक मध्ये काम केले. अभिनेता होणे ही एक प्रक्रिया आहे. आरशा समोर बसून मेकअप करणे, संबंधित व्यक्तीरेखाचे कपडे घालणे त्यावेळी कलाकाराचे व्यक्तिमत्व घडत जाते. लहानपणीची रंगभूमी, स्टेज आणि मेकअप गंध अनेक वर्षांनंतर देखील आज माझ्या मनात आठवणीत आहे. वयाच्या १२ व्या वर्षी नाटक बाबत माहिती मिळाली.साहित्य, संस्कृती याची जाण असणे गरजेचे असते. विजय तेंडुलकर यांचे ” माणूस नावाचे एक बेट” नाटक लेखन मला खूप भावले. पुण्यात बी.जे.मेडिकल महाविद्यालयात मी शिक्षण घेताना वास्तव्यास असताना, मोहन आगाशे आणि कुमार सप्तर्षी माझ्या सोबत शिक्षण घेत होते.त्याकाळी सप्तर्षी यांच्यात चळवळीत काम करत असल्याने पुढारीपण होते तर आगाशे यांच्याकडे कलागुण होते. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पहिले नाटक “बळी” केले आणि त्याला चांगले यश मिळाले. विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल नाटकाचे लेखन केले.विजय तेंडुलकर यांना नाटक लिहिताना अनेक दबाव होता पण त्यांनी तटस्थ लेखन केले.प्रत्येक राज्य व्यवस्था मध्ये एक प्रमुख व्यक्ती असते आणि ती घाशीराम कोतवाल निर्माण करतात. त्यांचा वापर झाला की, त्या लोकांना फेकून देतात अशी सर्वत्र परिस्थिती आहे हे वास्तव नाटक मधून मांडले.१९ प्रयोग झाल्यावर प्रखर विरोध सुरू झाला आणि संस्थेचे प्रमुख यांनी राजीनामा दिल्याने हे क्लेशदायक असल्याने नाटक बंद केले. त्यानंतर आम्ही थिएटर अकॅडमी सुरू केली. एक वर्षाने ते नाटक आम्ही परत सुरू केले.लोकांनी ते नाटक डोक्यावर घेतले आणि त्याचे ८०० पेक्षा अधिक प्रयोग देश परदेशात झाले. महाराष्ट्राच्या माती मध्ये एक गुण आहे ज्या माणसाने कष्ट केले त्याचे मूळ तो कोणत्याही क्षेत्रात असला तरी त्याला लोक विसरत नाही. त्याकाळी नाटक करण्यासाठी तरुणाईने अनेकजण जिद्दीने पेटलेले होते. आम्ही राजकारण बद्दल कधी बोलत नाही, आम्हाला नाटक, दिग्दर्शन आवडते. प्रत्येक माणसात एक चांगलेपण असते. अटलबिहारी वाजपेयी यांनीं “उंबरठा ” हा माझा चित्रपट पाहून अभिनेत्री स्मिता पाटील हिला फोन करून त्यांनी सविस्तर चर्चा करत “तू मला खूप रडवले” म्हणाले. घाशीराम कोतवाल नाटक त्यांना हिंदीपेक्षा मराठी भाषा मध्ये आवडले होते. अरुण सरनाईक यांनी मला सामना चित्रपट शूटिंगवेळी ” गोडबोले” नाव यांनी ठेवले होते.
डॉ.मोहन आगाशे म्हणाले, बी जे मेडिकल कॉलेज मध्ये जब्बार हे नाटक करण्यामध्ये प्रसिद्ध होते. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये जब्बार यांच्याकडे सर्व विद्यार्थी नाटक शिकण्यासाठी गळ घालण्यास जात. जब्बार शिस्तप्रिय होता. दिग्दर्शक म्हणून तो कडक भूमिका घेत असल्याने त्याची दहशत होती. त्याच्या सांगण्यानुसार मी काम करत गेलो. हॉस्पिटल मध्ये काम करतानाच नाटक सराव मध्ये आम्ही गुंतलेले असत. घाशीराम कोतवाल नाटक नंतर जो सामाजिक विरोध झाला त्याकाळात कसे सामंजस्यपणे जब्बार वागला आणि मन स्थिर ठेवून परत नवीन नाटक सुरवात केली हे मला समजत नव्हते. नाटक, साहित्य,संगीत, कला या गोष्टी समाजातील विविध लोकांना एकत्रित आणतात. घाशीराम हे विशिष्ट परिस्थिती मधील व्यक्तिरेखा आहे.”मारुती कांबळेचे काय झाले” हा नेहमी वेगवेगळ्या प्रवृत्ती मध्ये असणार आहे. त्यामुळे ५० वर्षा नंतर देखील हा प्रश्न कायम राहणार आहे.
कुमार सप्तर्षी म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी जातीवाद संपुष्टात येऊन भाषावाद निर्माण झाला.कलाकार असला तरी त्याची वैचारिक बैठक महत्वाची असते. कला ही आभासी असते ती प्रत्यक्ष वस्तुस्थिती मध्ये दिसत नाही.