कोजागरी पौर्णिमेनिमित्त रंगली “ग़ज़लियत” ची मैफल*

तारां कित Avatar

 

 

पुणे : तुमको देखा तो ये खयाल आया.., स्वप्नांचे वय कायम सोळा.., सलोना सा साजन.., रंजीशे जो है.., अशा मराठी हिंदी, नव्या – जुन्या गाजलांचा सुरेख  मिलाफ असलेल्या   “ग़ज़लियत” दिल की दास्ता’ ची मैफल कोजागरी पौर्णिमेनिमित्त  एम ई एस सभागृह, बाल शिक्षण मंदिर, कोथरूड येथे रंगली.  सन्मिता धापटे शिंदे यांनी सादर केलेल्या का कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

या कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाचे सहआयुक्त राहूल मोरे, (अधीक्षक, कस्टम) सुरेश सोनावणे, सहसंचालक साखर आयुक्तालंय सचिन रावळ,निर्माता निलेश नवलाखा, उदय जगताप,  सोनाली तनपुरे,माजी नगरसेववक विजय खळदकर , नवनाथ जाधव,भारती दरेकर, विजयसिंह गायकवाड, लेखक शरद तांदळे, सुरेश वैराळकर  ,महेश थोरवे, विनोद गलांडे,  दर्शना सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.

 

कोजागरी पौर्णिमेनिमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमांमध्ये सन्मिता धापटे शिंदे यांनी विविध गझल सादर करत उपस्थितांची मने जिंकली.  ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेमध्ये त्यांना महागायिका या उपाधी सह विजयी घोषित केले गेले आहे. त्यांना दीप्ती कुलकर्णी, अपूर्व द्रविड, अपूर्व गोखले, कार्तिकस्वामी, रोहित कुलकर्णी यांनी साथ संगत केली.  या कार्यक्रमामधून रुहान आणि उल्मेघ यांनी  रसिकांसोबत संवाद साधत रंगत भरली.

Tagged in :

तारां कित Avatar