पुणे, महाराष्ट्र – १० ऑक्टोबर २०२५ – कोरेगाव पार्कमधील पुण्याचे प्रमुख लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशन कोपा येथे ‘द फेस्टिव सोआरे बाय एन्सेंबल’ या दोन दिवसांच्या फॅशन व क्राफ्ट्समॅनशिपच्या जल्लोषाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवाला अनुसरून हा विशेष पॉप-अप ११ व १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत पार पडणार आहे. देशातील सुमारे २० नामांकित ब्रँड्सच्या कलेक्शनमुळे कोपा या काळात फॅशनप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
सुसंस्कृत लक्झरीचा भाव पकडण्यासाठी खास निवडलेल्या ब्रँड्सच्या संमिश्रतेत राणा गिल सारख्या प्रतिष्ठित फॅशन डिझायनरच्या कलेक्शनपासून ते नाजूक डायमंड ज्वेलरी, PETA प्रमाणित व्हेगन फुटवेअर, हस्तनिर्मित डेकोर आणि दिवाळी गिफ्टिंग पर्यायांचा समावेश आहे. प्रत्येक ब्रँड आपापल्या कलात्मकतेने आणि आधुनिक डिझाइनद्वारे ग्राहकांना एक वेगळा आणि सर्जनशील अनुभव देणार आहे.
फॅशन आणि डिझाइनविषयी अभिरुचि असलेल्या पुणेकरांसाठी ही एक अनोखी संधी ठरणार आहे — येथे पारंपरिक भारतीय, वेस्टर्न, इंडो-वेस्टर्न आणि अॅथलीझर अशा विविध प्रकारच्या फॅशन कलेक्शनसोबतच लाइफस्टाइल आणि होम डेकोर ब्रँड्सचे प्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमातून कोपा पुन्हा एकदा फॅशन, संस्कृती आणि समुदाय यांना एकत्र आणणाऱ्या अर्थपूर्ण अनुभवांची परंपरा जपणार आहे.