पुणे, ७ ऑक्टोबर २०२५ : न्युट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया (एन.एस.आय.), सिंबायोसिस स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स अॅण्ड न्यूट्रिशनल सायन्सेस (एस.एस.सी.ए.एन.एस.), सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ टी.एस.एम.एच. यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘पोषण संवाद’ — “कुटुंबाच्या स्वास्थ्यपूर्ण वाटचालीसाठी घरातील पुरुषांचा सहभाग” हा विशेष कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त न्युट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया (एन.एस.आय.), पुणे विभाग तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘पोषण संवाद’ या संवाद मालिकेचा उद्देश जनसामान्यात पोषणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि कुटुंबाच्या आरोग्यदायी वाटचालीत सर्वांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा आहे. मालिकेतील पहिल्या दोन सत्रात डॉ. अर्चना ऐनापुरे यांनी “बौद्धिक स्वास्थ्य व पोषण आहार” या विषयावर मार्गदर्शन केले, तर डॉ. सुचित्रा रॉय यांनी “आपला आहार — स्त्री की पुरुषानुसार बदलतो का?” या विषयावर विचारमंथन केले.या मालिकेतील तिसऱ्या सत्राचा विषय होता — “कुटुंबाच्या स्वास्थ्यपूर्ण वाटचालीसाठी तसेच पोषण गरजांच्या जाणिवा निर्माण करण्यासाठी घरातील पुरुषांचा सहभाग.”
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. राधिका हेडाऊ (समन्वयक, एन.एस.आय. पुणे विभाग; असिस्टंट प्रोफेसर, सिंबायोसिस स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स अॅण्ड न्यूट्रिशनल सायन्सेस) यांनी केले. आयोजन डॉ. हर्षदा ठाकूर (सचिव, एन.एस.आय. पुणे विभाग) आणि सौ. अनुजा मोहिले (ट्रेजरर, एन.एस.आय. पुणे विभाग व न्यूट्रिशन प्रोग्रॅम कन्सल्टंट, टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ) यांच्या सहकार्याने करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सिंबायोसिस स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स अॅण्ड न्यूट्रिशनल सायन्सेस चे संचालक प्रा. अतुल गोखले म्हणाले की, “पुरुषांनीही स्वयंपाक घरातील जबाबदाऱ्या सामायिक कराव्यात; स्वयंपाकातील समान सहभाग ही काळाची गरज आहे.”
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद चे सायंटिस्ट ‘एफ’ व हेड, एन.आय.सी.एच.ई.डॉ. सुब्बाराव एम. गवारावरापु म्हणाले की,“अन्न साक्षरता (फूड लिटरेसी) शालेय स्तरावर रुजवली गेली पाहिजे.”
टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ, पुणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ. गिरीष लाड म्हणाले की, “पुरुषांच्या सक्रिय सहभागासाठी सर्व भागधारक — शाळा, कुटुंब, संस्था आणि धोरणकर्ते — एकत्र येऊन कार्यक्रम व धोरणे आखावीत.”
वर्ल्ड फूड प्रोग्रॅम, मुंबई चे न्यूट्रिशन ऑफिसर डॉ. सिद्धार्थ वागुलकर म्हणाले की, “लैंगिक भेदभावविरहित माहिती, शिक्षण आणि संवाद साहित्य विकसित करणे आवश्यक आहे.”
एन.एस.आय. पुणे विभागाच्या ‘पोषण संवाद’ मालिकेचा उद्देश तज्ञ, विद्यार्थी आणि समाजाला एकत्र आणून पोषणाबाबत व्यवहार्य जागरूकता निर्माण करणे हा आहे. घरातून सुरू होणाऱ्या लहान बदलांमुळे समाजात मोठे सकारात्मक परिवर्तन घडवता येऊ शकते, हा या मालिकेचा मुख्य सं
देश आहे.