पुणे, ७ ऑक्टोबर २०२५ :
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ‘डीईएस पुणे विद्यापीठा’च्या पहिल्या दीक्षांत समारंभाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष प्रा. (डॉ.) टी. जी. सीताराम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
येत्या गुरुवारी (९ ऑक्टोबर) सकाळी ११.०० वाजता बी.एम.सी.सी. महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘डीईएस पुणे विद्यापीठा’चे अध्यक्ष प्रा. (डॉ.) रविंद्र आचार्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, कुलगुरू प्रा. (डॉ.) राजेश इंगळे, कुलसचिव डॉ. संजीवनी शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि गणित, व्यवसाय आणि व्यवस्थापन, डिझाईन आणि कला तसेच मानवशास्त्र आणि सामाजिक विज्ञान या पाच विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. महेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.