पिंपरी, दि. ७ ऑक्टोबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील तसेच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त आण्णा बोदडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये करण्यात आलेल्या अभिवादन प्रसंगी माजी नगरसदस्य अरूण टाक,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विधीतज्ञ ॲड.सागर चरण, मनोज माछरे,गणेश भोसले,अनिल लखन,यूनुस पगड़ीवाले, विशाल सोनवाल,धनपत बेहनवाल, शेखर बेलपथर
तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमास वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप वैद्यकीय अधीक्षक
डॉ.उज्वला अंदुरकर, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.मनीषा सूर्यवंशी ,विधीतज्ञ ॲड.सागर चरण,डॉ शैलजा भावसार,महादेव बोत्रे,मेट्रन वत्सला वाजे,असिस्टंट मेट्रन स्वाती कुलकर्णी,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मनोज माछरे,गणेश भोसले,अनिल लखन,आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी, सफाई मित्र उपस्थित होते. याप्रसंगी रुग्णालयातील सफाई मित्रांचा सन्मान करण्यात आला.
आदर्श जीवनमुल्यांचा संदेश देणारे महर्षि वाल्मिकी यांनी मानवतेचा, सत्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या आदर्श जीवनप्रवास समाजातील सर्वांसाठी प्रेरणादायी आ
हे.