टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सने शून्य-उत्सर्जन ट्रकिंगमध्ये प्रगती केली, एन्‍व्‍हायरो व्‍हील्‍स मोबिलिटीला अत्‍याधुनिक प्राइमा ई.५५एस इलेक्ट्रिक प्राइम मूव्‍हर्सचे वितरण

तारां कित Avatar

मुंबई, 09 ऑक्‍टोबर २०२५: टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍स या शाश्वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍समधील आघाडीच्‍या कंपनीने आज ऊर्जा, खाणकाम, सिमेंट व स्‍टील क्षेत्रांसाठी हरित व्‍यावसायिक परिवहन सोल्‍यूशन्‍सची आघाडीची प्रदाता एन्‍व्‍हायरो व्‍हील्‍स मोबिलिटीला प्रगत टाटा प्राइमा ई.५५एस बॅटरी इलेक्ट्रिक प्राइम-मूव्‍हरच्‍या डिलिव्‍हरीजना सुरूवात केली. आज चित्तोडगढ, राजस्‍थान येथे ताफ्याची पहिली बॅच सुपूर्द करण्‍यात आली. हेवी-ड्युटी, शून्‍य-उत्‍सर्जन प्राइमा ई.५५एस खनिजे व धातूंच्‍या वाहतुकीसाठी तैनात करण्‍यात येईल.

 

वेईकल्‍सच्‍या पहिल्‍या बॅचला स्‍वीकारत एन्‍व्‍हायरो व्‍हील्‍स मोबिलिटीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक आणि इनलँड वर्ल्‍ड लॉजिस्क्टिसचे संचालक श्री. प्रवीण सोमानी म्‍हणाले, ”लॉजिस्टिक्‍स शाश्वत करण्‍याप्रती कटिबद्ध नवीन कंपनी म्‍हणून आमच्‍या ताफ्यामध्‍ये टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या प्रगत इलेक्ट्रिक प्राइमची भर कार्यसंचालनांचे डिकार्बनायझेशन करण्‍याच्‍या दिशेने निर्णायक पाऊल आहे. शून्‍य उत्सर्जन, उच्‍च दर्जाची कार्यक्षमता आणि प्रगत सुरक्षितता व आरामदायी वैशिष्‍ट्यांसह प्राइमा ई.५५एस आमच्‍या ग्राहकांच्‍या निव्‍वळ शून्‍य ध्‍येयांना पाठिंबा देण्‍यासाठी योग्‍य निवड आहे. टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या प्रमाणित विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेच्‍या पाठबळासह आम्‍हाला भविष्‍याकरिता सुसज्‍ज ताफा निर्माण करण्‍याचा आत्‍मविश्वास आहे, जो शुद्ध व कार्यक्षम खनिजे व धातूंच्‍या वाहतुकीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करतो.”

 

वेईकल डिलिव्‍हरीबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”आम्‍हाला एन्‍व्‍हायरो व्‍हील्‍स मोबिलिटीला प्राइमा ई.५५एस इलेक्ट्रिक प्राइम मूव्‍हर्सची पहिली बॅच डिलिव्‍हर करण्‍याचा आनंद होत आहे. ट्रक विभागातील बाजारपेठ अग्रणी टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सला प्रगत सोल्‍यूशन्‍ससह भारताच्‍या शाश्वत मालवाहतुकीप्रती परिवर्तनाचे नेतृत्‍व करण्‍याचा अभिमान वाटतो. या प्रबळपणे डिझाइन केलेल्‍या वेईकल्स एन्व्‍हायरो व्‍हील्‍सच्‍या शाश्वतता ध्‍येयांशी संलग्‍न आहेत, जे हरित कार्यसंचालनांना प्रगत करतात, तसेच दीर्घकालीन मूल्‍य देतात.”

 

टाटा प्राइमा ई.५५एस संपूर्ण इलेक्ट्रिक ड्राइव्‍हट्रेनसह प्रगत ईव्‍ही आर्किटेक्‍चरवर डिझाइन करण्‍यात आली आहे. या वेईकलमध्‍ये एकीकृत ई-अॅक्‍सल आणि उच्‍च रेंजसाठी अत्‍याधुनिक जनरेटिव्‍ह ब्रेकिंग आहे. एका चार्जमध्‍ये जवळपास ३५० किमीपर्यंतची रेंज देणाऱ्या या वेईकलमध्‍ये सानुकूल कार्यक्षमता व कामगिरीसाठी ई-अॅक्‍सलसह ३-स्‍पीड ऑटो शिफ्ट ट्रान्‍समिशन, तसेच उच्‍च अपटाइमसाठी ड्युअल गन फास्‍ट चार्जिंग क्षमता आहे. या वेईकलमध्‍ये प्रगत वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे ड्रायव्‍हर मॉनिटरिंग सिस्‍टम, लेन डिपार्चर वॉर्निंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम आणि क्रूझ कंट्रोल, तसेच अधिक सुरक्षिततेसाठी इलेक्‍ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्‍टम आणि पर्यायी एडीएएस वैशिष्‍ट्ये. हवेशीर सीट आणि टिल्‍ट-अँड-टेलिस्‍कोपिक स्‍टीअरिंग व्‍हीलसह सुसज्‍ज प्रीमियम प्राइमा केबिन ड्रायव्‍हरसाठी आरामदायीपणा व सोयीसुविधेमध्‍ये वाढ करते, ज्‍यामुळे ड्रायव्‍हरला येणारा थकवा कमी होतो आणि उत्‍पादकता वाढते.

 

टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍स बॅटरी इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी, हायड्रोजन इंटर्नल कम्‍बशन आणि हायड्रोजन फ्यूएल सेल अशा पर्यायी इंधन तंत्रज्ञानांद्वारे समर्थित नाविन्‍यपूर्ण गतीशीलता सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. कंपनीचा स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स, ट्रक्‍स, बसेस व व्‍हॅन्‍स अशा विविध श्रेणींमध्‍ये पर्यायी-इंधनची शक्‍ती असलेल्‍या व्‍यावसायिक वाहनांचा प्रबळ पोर्टफोलिओ आहे. या पोर्टफोलिओला पूरक त्‍यांच्‍या Sampoorna Seva 2.0 उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सर्वसमावेशक वाहन जीवनचक्र व्‍यवस्‍थापनासाठी मूल्‍यवर्धित सेवांची श्रेणी आहे. भारतातील ३२०० हून अधिक टचपॉइण्‍ट्सच्‍या सर्वात मोठ्या सर्विस नेटवर्ककडून २४x७ तास सपोर्टसह कंपनी आपल्‍या वेईकल्‍ससाठी सर्वोच्‍च अपटाइम

देते.

Tagged in :

तारां कित Avatar