पुणे ९ ऑक्टोबरः तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक नवनिर्मिती, भागीदारी आणि विश्वशांती यावर आधारित असलेल्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा ७वा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वा. विश्व सभामंडप, वर्ल्ड पीस डोम, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी ६८०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रा.गणेश पोकळे आणि परिक्षा नियंत्रक डॉ. राहुल जोशी यांनी दिली.
या समारंभासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि लेखक प्रा.डॉ. राम चरण हे सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
तसेच माईर्सचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, माईर्सच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ आर.एम.चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात श्वेता राजश्री अय्यर हिला ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ व वेदांगी गुणेश पाटकर हिला ‘एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मेडल’ ने गौरविण्यात येणार आहेत. तसेच ११४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, ९६ रौप्य आणि ९६ कांस्य पदक असे एकूण ३०६ विद्यार्थ्यांना मेडल बहाल करण्यात येणार आहेत. तसेच ३७ विद्यार्थ्यांना पी.एचडी देण्यात येणार आहेत.
डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग, रामचरण स्कूल ऑफ लिडरशीप बिझनेस, ईकॉनॉमिक्स अॅण्ड कॉमर्स, स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड एनवोमेंटन्टल स्टडीज, डिझाइन, लिबरल ऑर्टस, लॉ आणि कॉन्शसनेस या व्यतिरिक्त अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार आहे.