सासवड, जेजुरी, फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील नगरपरिषदांअंतर्गत विविध विकास कामांबाबत आणि अत्यावश्यक सेवा सुविधांबाबत आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज आढावा बैठक घेतली.
या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच शासकीय स्तरावर आढावा घेण्यात आला.
आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय श्री. अभिषेक कृष्णा, शासनाचे उपसचिव श्री. अनिरुद्ध जेवळेकर, जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुड्डी, माजी आमदार श्री. संजय जगताप, पुण्याचे विभागीय सहायुक्त श्री. चंद्रकांत खोसे, जिल्हा सहयुक्त श्री. व्यंकटेश दुर्वास, फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषद प्रशासक श्री. सचिन पवार, मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे, जेजुरी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. चारुदत्त इंगोले, सासवड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. कैलास चव्हाण यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.