क्षेत्रातील पहिल्या वेगवान, ऑफलाईन टू ऑनलाई प्लेबुक मुळे रिटेलर्सना विश्वसनीय आणि व्यवसायास योग्य डिजिटल प्रोफाईल प्राप्त होणार
एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके तर्फे आज त्यांच्या माय बिझनेस क्युआरची सुरुवात करत असल्याची घोषणा ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये केली.
माय बिझनेस क्युआर हा छोट्या व्यावसायिकांसाठी विशेष असा भारतातील पहिला कॉमर्स आयडेंटिटी क्युआर आहे. या क्युआरची सुरुवात ही बँकेच्या स्मार्ट हब व्यापार या प्रसिध्द ॲपची पुढची पायरी म्हणून व्यापारीफाय च्या सहकार्याने करण्यात आली असून स्मार्टहब व्यापारचे आधी पासूनच देशभरांतील २ दशलक्षांहून अधिक व्यापारी वापर करत आहेत.
या अनोख्या क्युआरचा उपयोग भारतातील दोन डिजिटल सवयींच्या वापरातून होत आहे. जसे क्युआर पेमेंट आणि चॅट, यामुळे आता सोपा एंगेजमेंट वर आधारीत खरेदीचा अनोखा अनुभव प्राप्त होतो. माय बिझनेस क्युआर मुळे व्यापारी आता त्यांचे डिजिटल प्रोफाईल तयार करुन त्यांच्या स्टोअर फ्रंटला दुप्पट क्षमतेचे प्रोफाईल बनवू शकतील. यामुळे ग्राहक आता स्कॅन करुन त्या व्यापार्याचे प्रोफाईल त्यांच्या फोन मध्ये थेट सेव्ह करु शकतील. ‘माय बिझनेस क्युआर’ मुळे व्यापारी आता अधिक प्रमाणात सर्च इंजिन ऑप्टिमाईज्ड लिस्टींग्ज मिळवून ग्राहकांना सुध्दा थेट ऑर्डर करुन उत्पादने आणि सेवांसाठी लगेच पेमेंट अतिशय सुरक्षित पध्दतीने करणे शक्य होणार आहे.
एचडीएफसी बँकेच्या या नवीन उत्पादनामुळे एसएमईज ना स्थानिक डिजिटल व्यवसायातील अधिक हिस्सा मिळवणे शक्य होईल, ते सुध्दा अधिकची मोठी गुंतवणूक, जटील गोष्टी किंवा तंत्रज्ञानात सुधारणा न करता हे शक्य होईल.
या सुरुवाती विषयी बोलतांना एचडीएफसी बँकेच्या पेमेंट्स आणि डायरेक्ट बँकिंग चॅनल्स चे प्रमुख रजनीश प्रभू यांनी सांगितले “ एचडीएफसी बँके मध्ये आम्ही नेहमीच प्रत्येक व्यापार्याला तंत्रज्ञानाने सक्षम करुन त्यांच्या व्यवसायाची वाढ करत ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास सक्षम करत असतो. आमच्या स्मार्टहब व्यापार ॲप मुळे आम्ही डिजिटल पेमेंट्स व्यापार्यांसाठी सोपे करण्या बरोबरच आता माय बिझनेस क्युआर मुळे त्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेत त्यांचा व्यापार वाढवण्यास मदत करत आहोत. जीएफएफ मधील ही सुरुवात आमच्या छोट्या व्यापार्यांना सोप्या आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञानाच्या उपायांचा वापर करण्याच्या आमच्या वचनबध्दतेला अधोरेखित करते.”
या विषयी अधिक माहिती देतांना व्यापारीफायच्या संस्थापिका रुबी जैन यांनी सांगितले “ व्यापारीफाय मध्ये आम्ही नेहमीच प्रत्येक छोट्या व्यवसायाला सोपी डिजिटल ओळख देण्यास सक्षम करुन त्यामुळे ते ग्राहकांना सर्च, सेव्ह आणि एंगेज करु शकतील. एचडीएफसी बँके बरोबर एकत्र येऊन आम्ही भारतातील व्यापार्यांना क्षेत्रात प्रथमच कॉमर्स आयडेंटिटी क्युआर देत असून हा क्युआर त्यांची ओळख, शोध आणि ग्राहकांच्या जोडणीसह व्यापारही देत आहेत. हे केवळ तंत्रज्ञान नव्हे तर यामुळे कोट्यावधी स्थानिक व्यावसायिकांना सध्याच्या डिजिटल इको सिस्टम मध्ये जोडून असलेल्या ग्राहकांबरोबरही जोडण्याची संधी देत आहोत.”
या लाँचसह, एचडीएफसी बँक आणि व्यापारीफाय भारतातील व्यापाऱ्यांसाठी डिजिटल समावेशनाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहेत, ज्यामुळे लहान व्यवसायांना केवळ पेमेंट गोळा करणेच नव्हे तर त्यांचे डिजिटल अस्तित्व निर्माण करणे देखील सोपे होईल.
जीएफएफ २०२५ मध्ये एचडीएफसी बँके तर्फे पुढील पिढीतील पेमेंट सोल्युशन्सची ही सुरुवात केली असून त्याचे डिझाईन युपीआय आणि भारतातील डिजिटल रुपयां नुसार करुन रोजचे व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित हो
तील.