संधिवाताच्या व्यवस्थापनामध्ये औषधांबरोबरच जीवनशैली आणि फिजिओथेरपीची भूमिका महत्त्वाची

तारां कित Avatar

पुणे,10 ऑक्टोबर 2025 : संधिवातामुळे होणाऱ्या वेदनांना खचून न जाता लवकर निदान,योग्य उपचार आणि त्याचबरोबर फिजिओथेरपी आणि चांगल्या जीवनशैलीसह याचे व्यवस्थापन करता येऊ शकते,असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

 

12 ऑक्टोबर हा जागतिक संधिवात दिन म्हणून ओळखला जातो.यावर्षीची संकल्पना ही अचिव्ह युवर ड्रीम्स ही आहे.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील स्पाईन सर्जन डॉ.विशाल चौधरी म्हणाले की,संधिवात हा सहसा वयोमानामुळे उद्भवणारा आजार समजला जातो,परंतु संधिवाताचे अनेक प्रकार आहेत.60 वयानंतर वयोमानानुसार हाडांच्या एका बाजूला असलेल्या व सुरक्षा प्रदान करणाऱ्या कुर्चाची झीज झाल्यास वेदना सुरू होऊ शकतात,याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणून ओळखले जाते.

 

परंतु 35 ते 50 या वयोगटात ऱ्ह्युमॅटाईड आर्थरायटिस आणि त्याहीपेक्षा तरूण वर्गात अँकिलोझिंग स्पाँडिलायटिसचे प्रमाण दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण बैठी जीवनशैली,चुकीचा आहार,पर्यावरणीय बदल आणि वाढलेल्या जागरूकतेमुळे होणारे निदान हे आहे.

 

निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधांबरोबरच कडकपणा आणि वेदना कमी करण्यासाठी फिजिओथेरपी आणि शरीराची हालचाल फायदेशीर ठरते. ऱ्ह्युमॅटाईड आर्थरायटिसच्या व्यवस्थापनासाठी गरज पडल्यास बायोलॉजिकल इंजेक्शन्स आणि अँकिलोजिंग स्पाँडिलायटिसच्या उपचारासाठी इम्युनोमोड्युलेटरी थेरपी दिली जाऊ शकते. वयोमानामुळे होणाऱ्या ऑस्टिओआर्थरायटिसच्या उपचारामध्ये रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमुळे अधिक अचूकता साध्य होऊ शकते

.

 

 

Tagged in :

तारां कित Avatar