एमआयटी डब्ल्यूपीयूचा ७ वा दीक्षांत समारंभ, ६८०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
पुणे ११ ऑक्टोबरः “व्यवहार चातुर्याचे शिक्षण आणि ‘मिशन अॅण्ड द अॅक्शन’ या दोन तत्वांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आयुष्याची पुढील वाटचाल करावी. नेल्सन मंडेला सतत म्हणायचे समाज परिवर्तनासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे शस्त्र आहे. तसेच, शिक्षणातूनच सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिग्री घेतल्यानंतरही सतत अध्ययन करावे.”असे विचार पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा ७वा दीक्षांत समारंभ शनिवारी विश्व सभामंडप, विश्वराजबाग, लोणीकाळभोर, पुणे येथे पार पडला. यावेळी विद्यापीठाच्या ६८०० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
आयुष्यभर शिक्षण आणि शांतीसाठी केलेल्या कार्याबद्दल पश्चिम बंगाल राज्यपाल वतीने पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांनी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘गव्हर्नर्स अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ ने गौरविण्यात आले.
यावेळी आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि लेखक प्रा.डॉ. राम चरण हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव प्रा.गणेश पोकळे, डॉ. सुनिता मंगेश कराड, डब्ल्यूपीयूचे सीईओ डॉ. प्रसाद खांडेकर, सीओओ डॉ. संतोष सोनावणे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. राहुल जोशी, तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता व संचालक सर्व उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थी श्वेता राजश्री अय्यर हिला ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ व वेदांगी गुणेश पाटकर हिला ‘एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मेडल’ ने गौरविण्यात आले. तसेच ११४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, ९६ रौप्य आणि ९६ कांस्य पदक असे एकूण ३०६ विद्यार्थ्यांना मेडल देण्यात आले. तसेच ३७ विद्यार्थ्यांना पी.एचडी देण्यात आली.
डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग, रामचरण स्कूल ऑफ लिडरशीप बिझनेस, ईकॉनॉमिक्स अॅण्ड कॉमर्स, स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड एनवोमेंटन्टल स्टडीज, डिझाइन, लिबरल ऑर्टस, लॉ आणि कॉन्शसनेस या व्यतिरिक्त अन्य शाखेतील विद्याथ्यार्र्ना पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.डॉ. रामचरण म्हणाले,” जीवनात यशस्वी होण्यासाठी रोज मानसिक क्षमता वाढविणे, रोज अध्ययन करणे, लोकांबरोबर काम करायला शिकणे, लोकांच्या विश्वास पात्र राहणे आणि विश्वास करायला शिकणे, तसेच सत्य आणि वचन दिलेले पाळा या जागतिक तत्वाचे अत्यंत महत्व आहे. डिग्री घेतल्या नंतर खरा प्रवास आता सुरू झालेला आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान ही तत्व जीवनात शांती निर्माण करतात. विद्यार्थ्यांनी शिस्त आणि वचन बद्धतेचे पालन करावे. तसेच धर्म आणि स्वतःच्या कर्तव्याला ओळखावे,भविष्यात सुख-समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविण्याचे दायित्व भारताचे आहे.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” हे विद्यापीठ जागतिक स्तरावरील ज्ञानबरोबरच आध्यात्मिक ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य करते. परिवर्तनीय भारतासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असेल. तसेच शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून समाजातील जास्तीत जास्त समस्या सोडविण्यावर अधिकभर दिला जात आहे.”
अजित नायर म्हणाले, ” पुणे हे विद्वांनांचे शहर असून त्यांची जगाला ओळख आहे. यदा दृष्टि तथा सृष्टी या नुसार नवनिर्मितीमुळे राष्ट्राचे निर्माण होते. वर्तमान काळात चॅट जेपीटी आणि अन्य एआय टुल्सने जग बदलत असून समाजाच्या संवादाची भाषा बदलत आहे. तसेच एआयचा वापर जगाच्या कल्याणासाठी आणि विनाशासाठी सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे याचा जपून वापर करावा. तसेच येथे कृत्रिम बुद्धिमत्ता मध्ये पीएचडी घेणार्यांचे अभिनंदन. ”
कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राहुल जोशी यांनी
आभार मानले.