पुणे -12 ऑक्टोबर 2025- परदेशातून शिक्षण व रोजगारासाठी मोठी संधी असून महाराष्ट्र राज्यातून मोठया प्रमाणावर जर्मनी व जपानकडून मोठया प्रमाणावर मनुष्यबळाची मागणी झाली असल्याचे महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात सांगितले.
शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवारी स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री पाटील यांच्या हस्ते खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील वर्ल्ड बेस्ट स्कुल पुरस्कार विजेत्या पुणे जिल्हा परिषद kशाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय वारे गुरुजी व क्विक हिल टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे चेअरमन कैलास काटकर यांचा शिवसह्याद्री आधारवड पुरस्कार देऊन खास सन्मान करण्यात आला. रोख प्रत्येकी 21 हजार रुपये, सन्मान चिन्ह, स्मृती चिन्ह, शाल, पुष्पगुछ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
तसेच ट्रस्टतर्फे 1 कोटी 80 लाख रुपयांच्या ठेवीच्या व्याजातून आज 90 विध्यार्थ्यांना 11 लाख रुपयांची व मराठवाडा आणि सोलापूर भागातील पूरग्रस्त भागातील 83 विध्यार्थ्यांना 15 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप श्री पाटील, वारे गुरुजी व काटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जर्मनीमध्ये तरुणांची संख्या कमी झालेली आहे. वृद्धाच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण, रोजगारासाठी तरुणांची गरज भासू लागली आहे. महाराष्ट्रातर्फे 4 हजार तरुणांची निवड करून त्यांना जर्मनीत पाठवले जाणार आहे. जर्मन सरकार या विध्यार्थ्यांचे शिक्षण, नोकरी व अन्य सर्व व्यवस्था करणार आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मागणी केली की, विध्यार्थ्यांना जगभरातील शिष्यवृत्तीची माहिती मिळण्यासाठी पोर्टल तयार करावे.
वारे गुरुजी म्हणाले की, सरकारी शाळा सुधारण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे.
शशांक मोहिते यांनी घेतलेल्या मुलाखत्तीमध्ये श्री काटकर यांनी आपल्या आई वडिलांच्या प्रेरणा मुळे आपण प्रगती करू शकलो. तसेच
नवीनशिकण्याचा ध्यास यामुळे आपली प्रगती झाली.
शिकण्याचा ध्यास यामुळे आपली प्रगती झाली.
उच्च शिक्षणासाठी जपान सरकार बरोबर लवकरच महाराष्ट्र सरकार सामंजस्य करार करार करणार असल्याची उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात दिली