पुणे : आरआर काबेल यांच्या तर्फे काबेल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२५ हा कार्यक्रम नुकताच सीओईपी होस्टेल समोरील फिरोदिया सभागृहात पार पडला. यामध्ये काबेल स्टार सीझन ४ अंतर्गत पुण्यातील ८१ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून देशातील १ हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.
हा अनोखा उपक्रम दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करणाऱ्या इलेक्ट्रिशियनच्या मुलांसाठी राबविण्यात येतो. मेहनती आणि हुशार विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन तसेच पाठबळ देण्यासाठी दरवर्षाला १ कोटी रुपयाहून अधिक निधीची तरतूद आर आर काबेल यांच्या तर्फे केली जाते.
आतापर्यंत देशभरातील सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक शिष्यवृत्तीसाठी निवडण्यात आले आहे. या हुशार मुलांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी केवळ आर्थिक मदतच मिळवली नाही तर त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल देखील टाकले आहे. त्यांच्या पुढील शिक्षणाला चालना आणि पाठिंबा देण्यासाठी लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले.
आर आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती काबरा म्हणाल्या, आमचे काबेल दोस्त व्यवसायात नेहमीच भागीदारापेक्षा जास्त आहेत. ते आमच्या प्रवासाचा पाया आहेत. काबेल स्टार शिष्यवृत्तीसह, आम्ही केवळ आर्थिक मदत देत नाही, तर पिढ्यांचे जीवन बदलू. सन २०२२ मध्ये, काबेल स्टार स्कॉलरशिप हा उपक्रम इलेक्ट्रिशियनच्या मुलांना उच्च शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आला होता.
या इलेक्ट्रिशियनना प्रेमाने ‘काबेलदोस्त’ म्हणून ओळखले जाते. हा उपक्रम सुरू झाल्यापासूनच त्याचा परिवर्तनकारी परिणाम झाला आहे. कारण यामुळे देशभरातील पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते आहे. गेल्या काही वर्षांत, या कार्यक्रमाचा विस्तार आणि महत्त्व दोन्ही वाढले आहे, ज्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे.