एम | ओ | सी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर तर्फे पुण्यातील बाणेरमध्ये पाचवे उपचार केंद्र सुरु

तारां कित Avatar

पुणे, १३ ऑक्टोबर २०२५: भारतात अल्पश्या कालावधीत कर्करोग उपचार क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण करणार्‍या एम | ओ | सी कॅन्सर केयर अँड रिसर्च सेंटरने पुण्यात बाणेर येथे नुकतेच आपल्या पाचव्या केंद्राचे उद्घाटन केले. आंतरराष्ट्रीय निर्देशांना अनुसरून, दर्जेदार कॅन्सर उपचार सेवा अधिक सुलभ, सुखकर आणि रुग्णकेंद्री करण्याच्या प्रामाणिक हेतूने सुरू झालेल्या एम | ओ | सी नामक संकल्पनेचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 

पुण्यातील शिवाजीनगर, पिंपरी- चिंचवड, स्वारगेट आणि कल्याणी नगर येथील केंद्र रुग्णसेवेचे काम अविरतपणे करत असताना, पुणे शहराच्या कोणत्याही भागातून किमान प्रवास करीत आपल्या कॅन्सर उपचार केंद्रावर पोहोचता यावे याकरता बाणेर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार, परवडणाऱ्या दरात आणि घरापासून किमान अंतरावर उपलब्ध असावेत हे एम | ओ | सी चे उद्दीष्ट आहे.

 

उद्घाटन प्रसंगी एम | ओ | सी बाणेरचे अनुभवी कर्करोगतज्ञ डॉ श्वेता लुंकड, डॉ मंगेश मेखा, डॉ निखिल शिरसी, डॉ रेश्मा पुराणिक आणि डॉ लिजा बलसारा उपस्थित होते.

 

भारतात कर्करोग ही एक सामाजिक आरोग्यविषयक समस्या बनत चालली आहे. अनुवंशिक, पर्यावरणविषयक आणि जीवनशैलीशी संबंधित घटकांमुळे कर्करोगाचे प्रमाण भारतात झपाट्याने वाढत आहे आणि पुण्यासह महाराष्ट्र राज्य त्याला अपवाद नाहीत. वाढत्या रुग्णसंख्येला आणि मुळात शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्टय़ा त्रासदायक अशा उपचारांच्या प्रवासाला, कोणतीही तडजोड न करता सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी एम | ओ | सी सारख्या उपचार केंद्रांची आवश्यकता आहे, असं एम | ओ | सी चे कर्करोगतज्ञ डॉ तुषार पाटिल म्हणाले. बाणेरसह पुण्यातील आमच्या केंद्रांवर केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, ईम्यूनोथेरपी, तसेच मोलेक्यूलर ऑन्‍कोलॉजी, सेल्यूलर थेरपी, बोन मॅरो ट्रांसप्लांट (हॉस्पिटल पार्टनर) या सर्व उपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत असही ते पुढे म्हणाले.

Tagged in :

तारां कित Avatar