अजितदादा, संपूर्ण कर्जमाफी करा नाहीतर खुर्ची सोडा!” — लोकनायक बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा.*

तारां कित Avatar

 

 

*भवानीनगर

राज्य सरकारला धक्कादायक इशारा देत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि लोकनायक बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

“अजितदादा, तुम्ही म्हणता पैशाचं सोंग करता येत नाही! मग रस्त्यासाठी ८५ हजार कोटी देता, पण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायला पैसे नाही म्हणता? जमत नसेल तर खुर्ची सोडा!” — अशा शब्दांत बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट प्रहार केला.

 

भवानीनगर येथे ‘शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभा’ उत्साहात

भवानीनगर येथे शरद जोशी विचारमंच, शेतकरी कामगार एम.एस. फाउंडेशन आणि शेतकरी संघटना महासंघ यांच्या वतीने “शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभा” मोठ्या उत्साहात पार पडली. सभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, शेतकरी कर्जमुक्त हक्क समितीचे प्रदेश निमंत्रक विठ्ठलराजे पवार, स्वाभिमानी संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष अमरसिंग कदम, शेतकरी संघटना महासंघाचे प्रदेश युवक अध्यक्ष रवी उर्फ राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, अनिल भांडवलकर, श्रीकांत नलावडे, बाळासाहेब मगर, यशवंत बांगर, हिरामण बांदल, अनिकेत गागडे, सतीश काटे, अण्णा पाटील, मंगेश ढमाळे, किरण गोफणे, दिलीप वरपे पाटील, डॉ. शिरीष शिंदे, श्री वाघ यांसह शेतकरी, डेअरी असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन शहाजी शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोपने फरारचे जिल्हा अध्यक्ष महेश ढमाळ कार्यक्रमाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वय महेश बडे प्रहार चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गौरव जाधव, फलटण तालुका अध्यक्ष गावडे, बारामती तालुकाध्यक्ष रोहित पिसे, तसेच महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बच्चू कडूंचा सरकारला सवाल — “शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, पण बहीणीसाठी ३१ हजार कोटी?”

बच्चू कडूंनी सरकारवर थेट आरोप करताना सांगितले की,

“शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी केवळ ४८ हजार कोटी लागतात, पण लाडक्या बहीणीसाठी ३१ हजार कोटी कुठून आले? अजितदादा, तुमची ‘दादागिरी’ कुठे गेली?”

ते पुढे म्हणाले —

*“आम्ही जे बोलतो ते राजकारणासाठी नाही, ते शेतकऱ्यांसाठी आहे. जातीपातीच्या भांडणांत शेतकरी अडकला आहे, पण आपल्या हक्कासाठी मात्र तो पेटत नाही. ऊसाला ४२०० रुपये दर मिळाला पाहिजे. इतर व्यवसायात २००% नफा आहे, पण शेतकरी २०% तोट्यात आहे. निवडणुकांसाठी सरकारने ‘बटनवालं मशीन’ घेतलं आहे — मत कुणीही टाका, परिणाम त्यांच्याच बाजूने!” त्यांनी इशारा दिला —

“ही हुकूमशाही लोकशाहीच्या नावाखाली चालली आहे, आणि हे जनतेने आता उलथून टाकायलाच हवं.”*

 

*महादेव जानकर : “शेतकरी भिकारी, सहकार लुटणारे नेते टगे झाले!”*

सभेत बोलताना माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले,

“शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. दोन एकराच्या शेतकऱ्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. सरकार शेतकऱ्याच्या नावाने मतं मागते पण त्याच्या जखमा भरत नाही. मोठ्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्याचं सर्वस्व लुटलं. ऊस, दूध यांना योग्य भाव मिळाला पाहिजे — नाहीतर ही जनतेची आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही.”

 

विठ्ठलराजे पवार : “१७ मागण्या २८ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, नाहीतर नागपूरला ‘शेतकरी कर्जमुक्तीसाठी महाएल्गार महाआंदोलन’!”

 

शेतकरी संघटना महासंघाचे प्रदेश निमंत्रक विठ्ठलराजे पवार यांनी सभेच्या प्रस्ताविकेत ठाम भूमिका मांडली —

“ऊस बिनातून १५ रुपये कपात बंद करा. गाळप हंगाम २५-२६ साठी साडेचार हजार रुपये विना कपात एफआरपी जाहीर करा. रिकवरी बेस रेट ९% ठेवा.

खासदार-आमदारांनी एक वर्षाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा. सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत दंडाची वसूली करा. गोशाळांना मिळणारं अनुदान शेतकऱ्यांच्या भाकड गाईंसाठी थेट दिलं पाहिजे.” गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाची जबाबदारी राज्य सरकारची आहे राज्य सरकारने त्यांना पैसे द्यावेत शेतकऱ्यांच्या उसातून दहा रुपये ऐवजी गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी महामंडळाला केवळ एक रुपया प्रति टन देण्यासाठीचा कायद्यात दुरुस्ती करा अशी मागणी यावेळी केली आहे.

 

त्यांनी पुढे चेतावणी दिली —

 

“राज्य सरकारने १७ मागण्या २८ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण केल्या नाहीत, तर लाखो शेतकरी नागपूर येथे ‘महाअेल्गार कर्जमुक्ती सभा’ घेऊन राज्य सरकारविरुद्ध निर्णायक लढा उभारतील!”

 

चौकट :

 

[™बच्चू कडूंचा भावनिक इशारा.]*

*[ “कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. ना इस्लाम, ना हिंदू — मेरा किसान खतरे में है!

धर्माच्या नावाने भांडणं झाली तर शेतकरी म्हणून लढायला कोणी उरणार नाही. झेंडे कोणतेही लावा, पण शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढा द्या. साथ मिळाली तर गांधीगिरी, नाही मिळाली तर भगतसिंग गिरी!” — बच्चू कडू.]*

 

*ही सभा केवळ राजकीय भाषणांचा कार्यक्रम नव्हता, तर राज्यातील शेतकऱ्यांच्या जिवंत वेदनेचा आवाज होती.

भवानीनगरातून उमटलेला हा “कर्जमुक्तीचा एल्गार” आता थेट मंत्रालयाच्या दरवाज्यापर्यंत पोहोचेल, आणि सरकारने या इशाऱ्याकडे गांभीर्याने न पाहिल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राग राजकीय वादळात परिवर्तित होईल, हे निश्चित.*

 

 

 

चौकट

 

 

*”[ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ओला दुष्काळ, अन्नसुरक्षा च्या भयंकर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांकडील सर्व कर्ज वसुल्या तिन महीन्या साठी थांबवण्यात आलेल्या आहेत, त्याचे पालन करण्याच्या सूचना आदेश दिलेले आहेत तसेच कोणत्याही बँकेने कोणत्याही शेतकऱ्याला वसुलीसाठी नोटीस देऊ नयेत अशा सूचना केलेल्या असताना नाशिक जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक, पुणे जिल्हा बँक, सोलापूर जिल्हा बँक व इतर बँकांनी खोट्या माहिती देत शेतकऱ्यांना वसुलीसाठी दिलेल्या नोटिसा तात्काळ थांबवण्याचा इशारा यावेळी बच्चू कडू, विठ्ठल राजे पवार यांनी संबंधित बँका खाजगी व सावकारी बँका यांनी शेतकऱ्यांकडे सक्तीची वसुली नोटीस केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे, यावेळी सभेच्या स्थानावरून सातारा जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र सरकाळे , इंदापूर तालुक्याचे तहसीलदार बनसोडे साहेब यांना सूचना दिलेले आहेत.]*

Tagged in :

तारां कित Avatar