पुणे, दि. १३ ऑक्टोबर, २०२५ : पुण्यातील बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने ग. दि. माडगुळकर आणि व्यंकटेश माडगुळकर या माडगुळकर बंधूंच्या प्रवासावर आधारित ‘दोन पाती-एक बंध’ या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सायं. ५.३० वाजता मयूर कॉलनीमधील बालशिक्षण सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न होणार असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर यांनी कळविली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना समीर बेलवलकर म्हणाले, “ग. दि. माडगुळकर आणि व्यंकटेश माडगुळकर हे माडगुळकर बंधूंच्या मराठी साहित्यातील प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वे असून त्यांप्रती आदर व्यक्ते करण्यासोबतच त्यांच्याबद्दल नव्या पिढीला देखील माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही ‘दोन पाती-एक बंध’ या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी ‘ऐसी अक्षरे’च्या माडगुळकर बंधूंच्या साहित्यावरील विशेषांकाचे प्रकाशन होईल. सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर आणि ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. सदर कार्यक्रमाचे लेखन डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांचे असून प्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे कार्यक्रम सादर करतील.” ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रमस्थळी स्क्रीनची वेगळी व्यवस्था करण्यात आली असल्या