दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५’ चा दिमाखदार समारोप: ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

तारां कित Avatar

 

 

पुणे: महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या ‘दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५’ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले.

 

स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष होते. महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, नागपूर, नाशिक, धुळे आणि पुणे अशा सहा केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली. अंतिम फेरी 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती येथे घेण्यात आली. या वर्षी चुरशीच्या लढतीत ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेने कथानक, अभिनय आणि दिग्दर्शन या सर्वच स्तरांवर उत्कृष्टतेचा ठसा उमटवत सांघिक प्रथम क्रमांक पटकावत मानाचा फिरता करंडक पटकावला.

 

अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून मराठी नाट्यसृष्टीतील तीन दिग्गज मान्यवर प्रसिद्ध अभिनेते श्री. वैभव मांगले, प्रतिभाशाली लेखिका व अभिनेत्री सौ. मुग्धा गोडबोले-रानडे आणि जाणकार लेखक, दिग्दर्शक व अभिनेते श्री. योगेश शिरसाट यांनी परीक्षण समितीची धुरा सांभाळली. तसेच प्राथमिक फेरीचे परीक्षण श्री.नितीन धंदुके आणि श्री.श्रीकांत भिडे यांनी केले.

 

पारितोषिक वितरण समारंभास पी. एन. जी. ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ गाडगीळ आणि कार्यकारी संचालक श्री. पराग गाडगीळ तसेच दिग्दर्शक व मुख्य संयोजक श्री. अजय नाईक यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विजेत्या कलावंतांचा यथोचित गौरव करण्यात आला.

 

या स्पर्धेत कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे यांच्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेला प्रथम क्रमांकासह रोख रु. १,००,०००/- (एक लाख रुपये) आणि मानाचा फिरता दाजीकाका गाडगीळ करंडक प्रदान करण्यात आला. न्यू आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स,अहिल्यानगर यांच्या ‘काही प्रॉब्लेम ये का?’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावत रु. ७५,०००/- चे बक्षीस जिंकले, तर रंगपंढरी, पुणे या संस्थेच्या ‘बरड’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकासाठी रु. ५१,०००/- प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त थिएटर मॅजिक यांच्या ‘तू ना जाने आस पास है खुदा’ आणि कलांश थिएटर यांच्या ‘मढं निघालं अनुदानाला’ या दोन एकांकिकांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प्रत्येकी रु. १०,०००/- देऊन सन्मानित करण्यात आले.

 

‘दाजीकाका गाडगीळ करंडक’ या स्पर्धेने रंगभूमीला नवी आणि गुणवान प्रतिभा दिली असून, कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे असे मत श्री. सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले आणि येत्या काही वर्षात स्पर्धेचा अजून विस्तार करण्याचा विश्वास व्यक्त के

ले.

 

 

 

 

Tagged in :

तारां कित Avatar