मुंबई, 13 ऑक्टोबर 2025: भारतात सणांचा काळ म्हणजे आनंदाचा, उत्सवाचा आणि नवीन सुरुवातीचा काळ असतो. असा काळ जेव्हा कुटुंब मोठ्या खरेदीची योजना आखतात – मग ते नवीन घर खरेदी करणे असो, कार खरेदी करणे असो किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी हालचाल करणे असो. उत्सवाचे हे दिवस ग्राहकांसाठी अधिक खास आणि फायदेशीर बनवण्यासाठी बँक ऑफ बडोदाने त्यांची वार्षिक मोहीम, “बीओबी के संग त्योहार की उमंग – शुभ भी लाभ भी” सुरू केली आहे.
रिटेल ऑफर्स
यंदा सणानिमित्त आणलेल्या ऑफरिंगमध्ये बऱ्याच काळापासून असलेल्या आकांक्षा तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या ऑफर्सचा समावेश आहे. घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गृह कर्ज आता शून्य प्रक्रिया शुल्कासह वार्षिक 7.45% पासून सुरू होते. नवीन गाडी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी, कार कर्जाचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. तसेच वाहनाच्या प्रत्यक्ष किमतीवर 90% पर्यंत आर्थिक सहकार्य आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्ज परतफेडीचा कालावधी आठ वर्षांपर्यंत वाढवला गेला आहे. वास्तविक, ईव्ही खरेदीदारांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रक्रिया शुल्कात 50% सवलत देऊन बँक ऑफ बडोदा आणखी एक सुखद धक्का देत आहे.
सणासुदीचा काळ हा स्मार्ट आर्थिक पर्याय निवडण्यासाठी एक योग्य वेळ आहे. त्यासाठी, बँक ऑफ बडोदाने बीओबी मास्टरस्ट्रोक लाइट सेव्हिंग्ज अकाउंट सादर केले आहे. ज्यासाठी जास्त मासिक सरासरीची अट नाही मात्र, फायदे चिक्कार आहेत – मोफत प्रवास डेबिट कार्ड आणि जीवनशैली ऑफरपासून ते लॉकर्सवर सवलती आणि किरकोळ कर्जावरील व्याजदर सवलती आणि प्रक्रिया शुल्कावरील माफी.
सणाचा आनंद आणखी वाढवण्यासाठी, बँक ऑफ बडोदा त्यांच्या डेबिट कार्डधारकांसाठी प्रवास, अन्न, फॅशन आणि किराणा सामान यासारख्या सर्वाधिक मागणी असलेल्या श्रेणीतील आघाडीच्या ब्रँडशी करार करून आकर्षक उत्सवी सवलती देत आहे. ज्यामुळे सणाची खरेदी अधिक आनंदात, उत्साहात तर होतेच पण त्याचा खिशावर भार कमी पडतो.
व्यवसायांना सक्षम बनवणे
आपल्या या उत्सवी ऑफर अंतर्गत बँक ऑफ बडोदा व्यवसायांसाठी देखील अनेक उत्तम पर्याय देते आहे. बीओबी डिजी उद्यम द्वारे, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना आकर्षक व्याजदर, लवचिक प्रक्रिया शुल्कासह 100% डिजिटल आणि पेपरलेस प्रक्रियेसह 10 ते 50 लाख रुपयांपेक्षा जास्त तारण-मुक्त कार्यरत भांडवल कर्जे त्वरित मिळू शकतात.
बीओबी प्रॉपर्टी प्राइड मालमत्तेवर ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रदान करते. कमी मार्जिन आणि लवचिक अटींसह 25 कोटी रुपयांपर्यंत निधी देते. आणि विशेषतः बीओबी स्मार्ट करंट अकाउंट डिजिटल-सॅव्ही व्यवसायांसाठी डिझाइन केलेले आहे. यातील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून मोफत ऑनलाइन NEFT/RTGS/IMPS/UPI व्यवहारांसह मोफत POS/MPOS मशीन आणि QR साउंडबॉक्ससह येते.
या प्रसंगी बँक ऑफ बडोदाचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. शैलेंद्र सिंह म्हणाले, “सण म्हणजे केवळ समारंभ नाही, हे आम्ही जाणतो. तर एखाद्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याची तसेच आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण करणे म्हणजे खऱ्या अर्थाने सण साजरे करणे. नवीन घर खरेदी करणे असो, वाहन खरेदी करणे असो किंवा व्यवसायाचा विस्तार करणे असो, आमच्या ग्राहकांना त्यांची उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यास मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ‘बीओबी के संग त्योहार की उमंग’द्वारे, आमचे ग्राहक स्मार्ट आर्थिक पर्याय निवडू शकतात. जे केवळ उत्सवाचा आनंदच वाढवणार नाहीत तर त्याचे दीर्घकालीन मूल्य देखील निर्माण करतील.”
***