सणांचा हंगाम यंदा अतिशय सकारात्मक वातावरणात सुरू झाला आहे. दसऱ्यापासूनच सोनं, हिरे, चांदीचे दागिने तसेच चांदीच्या वस्तूंमध्ये स्थिर मागणी दिसून येत आहे. सोन्याच्या दरातील वाढीमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे आणि ते अजूनही मौल्यवान धातूंना विश्वासपूर्वक आणि दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून खरेदी करत आहेत.
आम्हाला बुलियन (सोनं आणि चांदी) तसेच दागिने या दोन्ही विभागांमध्ये चांगली हालचाल दिसून येत आहे. सरासरी खरेदीचे प्रमाण किंचित कमी झाले असले तरी एकूण खरेदीची भावना अत्यंत मजबूत आहे. ग्राहकांमध्ये आता सोनं आणि चांदी हे ‘ विश्वासाचं नवं चलन’ म्हणून पाहण्याची प्रवृत्ती वाढत आहे, ज्यामुळे मागणीत आणखी वाढ होत आहे. हलक्या वजनाचे सोन्याचे तसेच हिऱ्याच्या दागिन्यांकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे, आणि आमच्या लाइटस्टाइल बाइ पीएनजी या श्रेणीला विविध वयोगटांमधून आणि प्रसंगांमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
ग्राहकांची संख्या सर्व बाजारांमध्ये वाढली आहे आणि विशेष म्हणजे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील नव्याने सुरू झालेल्या आमच्या स्टोअर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जुने सोने देऊन नवीन दागिने घेण्याचा वाटा एकूण विक्रीपैकी सुमारे ५०–५५% आहे. यंदा धनत्रयोदशी आठवड्याच्या शेवटी येत असल्याने सकारात्मक गती दिसून येईल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत, आणि गेल्या वर्षाच्या मूल्याच्या तुलनेत १५–२०% वाढ होईल असा आमचा अंदाज आहे.”
– डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पी.एन.जी. ज्वेलर्स
—