सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स सलग सहाव्‍या वर्षी जागतिक ब्रँड्समध्‍ये ५व्‍या क्रमांकावर

तारां कित Avatar

गुरूग्राम, भारत – ऑक्‍टोबर १५, २०२५ – सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने आज घोषणा केली की, कंपनीला जागतिक ब्रँड कन्‍सल्‍टन्‍सी इंटरब्रँडने सलग सहाव्‍या वर्षी ५व्‍या क्रमांकाचा जागतिक ब्रँड म्‍हणून सन्‍मानित केले आहे. इंटरब्रँड दरवर्षी त्‍यांची ‘बेस्‍ट ग्‍लोबल ब्रँड्स’ यादी जारी करते. यंदाच्‍या यादीसाठी सॅमसंगने ९०.५ बिलियन डॉलर्स ब्रँड मूल्‍याची नोंद केली, ज्‍यासह २०२० पासून जागतिक टॉप ५ मध्‍ये राहणारी आशियातील एकमेव कंपनी म्‍हणून आपले स्‍थान कायम ठेवले आहे.

 

इंटरब्रँडच्‍या मते, सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या मूल्‍यांकनावर खालील बाबींचा सकारात्‍मक प्रभाव दिसून आला:

 

कंपनीच्‍या व्‍यवसाय विभागांमध्‍ये एआय स्‍पर्धात्‍मकता मजबूत केली.

उत्‍पादनांमध्‍ये एकत्रित एकीकरणाच्‍या माध्‍यमातून ग्राहक अनुभवांमध्‍ये वाढ केली.

एआय-संबंधित सेमीकंडक्‍टर्समधील गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित केले.

ग्राहक-केंद्रित ब्रँड धोरणाची अंमलबजावणी केली.

”एआय नाविन्‍यता आणि खुल्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून सॅमसंगने अधिकाधिक ग्राहक त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनामध्‍ये एआयचा अनुभव घेऊ शकण्‍याची खात्री घेण्‍यासाठी काम केले आहे,” असे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या ग्‍लोबल मार्केटिंग ऑफिसचे अध्‍यक्ष व प्रमुख वोन-जिन ली म्‍हणाले. ”अधिक पुढे जात आम्‍ही ग्राहकांना आरोग्‍य व सुरक्षिततेमध्‍ये फायदे देण्‍यावर लक्ष केंद्रित करू, ज्‍यामुळे सॅमसंग अधिक लोकप्रिय ब्रँड म्‍हणून विकसित होऊ शकेल.”

 

‘इनोव्‍हेशन फॉर ऑल’ दृष्टिकोनांतर्गत सॅमसंग सतत जगभरातील अधिकाधिक ग्राहकांना एआय उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न करते.

 

या वर्षी सॅमसंगने गॅलेक्‍सी एआयच्‍या सतत सुधारणेसह मोबाइल एआयमधील आपले नेतृत्‍व दृढ केले, ज्‍यामागे एआयच्‍या लोकशाहीकरणाला चालना देत वर्षभरात ते ४०० दशलक्ष डिवाईसेसवर उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स (सीई)मध्‍ये सॅमसंगने व्हिजन एआय आणि बीस्‍पोक एआय अशा प्रत्‍येक उत्‍पादन श्रेणीसाठी डिझाइन केलेले एआय तंत्रज्ञान सादर करत एआय स्‍पर्धात्‍मकता वाढवली आहे.

 

विविध सहयोगींसोबत खुल्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून सॅमसंगने ग्राहकांसाठी वैयक्तिकृत एआय अनुभवांमध्‍ये सुधारणा केली आहे, तसेच सॅमसंग नॉक्‍ससह उद्योगामधील अग्रणी सुरक्षितता देखील देत आहे.

 

सेमीकंडक्‍टर्समध्‍ये सॅमसंग क्‍लाऊड, ऑन-डिवाईस आणि फिजिकल एआयमधील सर्वसमावेशक पोर्टफोलिओसह एआयसाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करत आली आहे. यामध्‍ये एचबीएम, उच्‍च क्षमतेचे डीडीआर५, एलपीडीडीआर५एक्‍स आणि जीडीडीआर७ अशा प्रगत उत्‍पादनांसाठी सक्रिय प्रतिसादाचा समावेश आहे.

 

एआय व्‍यतिरिक्‍त, सॅमसंग आपली उत्‍पादने व सर्विसेसची उपलब्‍धता वाढवत आहे आणि सर्व व्‍यवसाय विभागांमध्‍ये शाश्वत नाविन्‍यतेला गती देत आहे. यामध्‍ये स्‍मार्टथिंग्‍जद्वारे कनेक्‍ट केलेल्‍या ऊर्जा-कार्यक्षम अप्‍लायन्‍सेसच्‍या माध्‍यमातून ऊर्जा बचतींचा समावेश आहे.

 

सॅमसंगचे प्रत्‍येक व्‍यवसाय विभागामधील मान्‍यताकृत प्रयत्‍न

 

मोबाइल

 

l गॅलेक्‍सी एआयसह मोबाइल एआय युगाचे नेतृत्‍व आणि एआयच्‍या लोकप्रियतेला चालना देण्‍यात येत आहे.

 

l गॅलेक्‍सी झेड फोल्‍ड७ आणि झेड फ्लिप७ च्‍या लाँचसह फोल्‍डेबल श्रेणीमधील नेतृत्‍व दृढ करण्‍यात आले.

 

l गोपनीयता व सुरक्षितता तंत्रज्ञान मजबूत करत ग्राहक विश्वास वाढवण्‍यात आला.

 

l प्रगत वेअरेबल्‍स, सॅमसंग हेल्‍थ सुधारणा आणि खुल्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आरोग्‍य सेवांचा विस्‍तार करण्‍यात आला.

 

नेटवर्क्‍स

 

l एआय-समर्थित व्‍हर्च्‍युअलाइज्‍ड रेडिओ अॅक्‍सेस नेटवर्क्‍स (व्‍हीआरएएन) आणि ओपन आरएएनमध्‍ये नेतृत्‍व मजबूत करण्‍यात आले.

 

l विविध ५जी युज केसेसना, तसेच हाय क्‍वॉलिटी स्ट्रिमिंग व गेमिंगला साह्य करण्‍यासाठी सतत तंत्रज्ञानांमध्‍ये नाविन्‍यता आणत आहे.

 

l ६जी च्‍या टेक्निकल मानकीकरणाचे नेतृत्‍व करत आहे.

 

l ग्राहक कंपन्‍यांसोबत सहयोग दृढ करत आहे आणि सॅमसंगच्‍या नेटवर्क तंत्रज्ञानाच्‍या शाश्वत पैलूंचा प्रसार करत आहे.

 

व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले

 

l टेलिव्हिजन्‍स, साऊंडबार्स आणि गेमिंग मॉनिटर्समध्‍ये जागतिक नेतृत्‍व दृढ करत आहे.

 

l व्हिजन एआयवर आधारित सर्वोत्तम एआय वैशिष्‍ट्यांसह व्‍युइंगमध्‍ये नाविन्‍यता आणत आहे.

 

l वै‍यक्तिकृत आर्ट टीव्‍ही अनुभव देण्‍यासाठी द फ्रेम व आर्ट स्‍टोअर सर्विसेस वाढवत आहे.

 

l टीव्‍ही प्‍लस, मनोरंजन, गेमिंग आणि संगीतामधील सहयोगांच्‍या माध्‍यमातून कन्‍टेन्‍ट ऑफरिंग्‍ज वाढवत आहे.

 

डिजिटल अप्‍लायन्‍सेस

 

l सतत उत्‍पादन नाविन्‍यता आणि प्रगत एआय क्षमतांच्‍या माध्‍यमातून रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्‍स अशा श्रेणींमध्‍ये जागतिक नेतृत्‍व कायम राखत आहे.

 

l स्‍मार्टथिंग्‍ज एकीकरणाच्‍या माध्‍यमातून विविध सोयीसुविधा आणि प्रगत एआय अनुभव देत आहे.

 

l ऊर्जा कार्यक्षमता, उपयुक्‍तता, कामगिरी आणि डिझाइनमधील बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍स नेतृत्‍व वाढवत आहे.

 

सेमीकंडक्‍टर

 

l क्‍लाऊड, ऑन-डिवाईस आणि फिजिकल एआय अॅप्‍लीकेशन्‍समध्‍ये वैविध्‍यपूर्ण पोर्टफोलिओ ऑपरेट करत आहे.

 

l डीडीआर, एसएसडी, एलपीडीडीआर, यूएफएस आणि ऑटो एसएसडीसह मोबाइल व ऑटोमोटिव्‍ह सेमीकंडक्‍टर्समध्‍ये नेतृत्‍व कायम राखत आहे.

 

l सीएमएम-डी आणि एचबीएम सारख्‍या नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍समध्‍ये विकास व गुंतवूणक कायम करत आहे.

 

l प्रभावी टेक इव्‍हेण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून दृष्टिकोन आणि उद्योग नेतृत्‍व शेअर करत आहे.

 

इंटरब्रँडच्‍या बेस्‍ट ग्‍लोबल ब्रँड्सना ब्रँड मूल्‍य मूल्‍यांकनानुसार रँकिंग दिले जाते, ज्‍यामध्‍ये कंपनीची आर्थिक कामगिरी व दृष्टिकोनाचे सर्वसमावेशक विश्‍लेषण, ग्राहकांच्‍या खरेदीवर ब्रँडचा प्रभाव आणि ब्रँड स्‍पर्धात्‍मकता (धोरण, सहानुभूती, वैविध्‍यीकरण, ग्राहक सहभाग, सातत्‍यतता, विश्वास यांसह) यांचा समावेश असतो. हे रँकिंग जगातील दीर्घकाळापासून ब्रँड मूल्‍य मूल्‍यांकन आहे, जे त्‍याच्‍या विश्वसनीयतेसाठी मोठ्या

प्रमाणात ओळखले जाते.

 

 

 

Tagged in :

तारां कित Avatar