समुदायांना सक्षम बनवणाऱ्या आणि रस्ता सुरक्षेचा प्रसार करणाऱ्या इनोव्हेटिव्ह मोबिलिटी उपाययोजनांमधील उत्कृष्टतेची दखल घेत ‘सेफ्टी रिसर्च फाउंडेशन’ (एसआरएफ) या संस्थेला त्यांच्या ‘ब्रेस’ (BRACE) प्रकल्पासाठी रस्ते सुरक्षा नवोपक्रम आणि उत्कृष्टता विभागात ज्युरीकडून विशेष प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले आहे.
मोबिलिटीच्या माध्यमातून समुदाय सशक्तीकरण आणि रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल देशभरातील संस्थांना सन्मानित करण्यात आले असून, विजेत्या संस्थांना एकूण ₹40 लाखांचे रोख पारितोषिक वितरण करण्यात आले.
पुणे (15 ऑक्टोबर 2025) : ब्रिजस्टोन इंडियाने आज पुण्यात आयोजित सोहळ्यात ‘मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स (MSIA) 2025’च्या पाचव्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. सामाजिक हित साधण्यासाठी साधन म्हणून वाहतुकीचा उपयोग करणाऱ्या संस्थांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. उद्योगक्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक बदलकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पुण्यात मुख्यालय असलेल्या ‘सेफ्टी रिसर्च फाउंडेशन’ (एसआरएफ) या संस्थेला त्यांच्या ‘ब्रेस’ (BRACE) या उत्कृष्ट प्रकल्पासाठी ज्युरीकडून विशेष प्रशंसा प्राप्त झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळेच्या परिसरांमध्ये सुरक्षा ऑडिट, पायाभूत सुधारणा, जनजागृती उपक्रम आणि समुदाय सहभाग यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. एसआरएफतर्फे आकडेवारीवर आधारित निरीक्षणे व प्रत्यक्ष कृतीद्वारे सुरक्षित वाहतुकीसाठी सरकारी संस्था, कॉर्पोरेट आणि समुदायांना एकत्र करण्यात येते. शास्त्रीय संशोधन आणि व्यावहारिक उपाययोजना यांची सांगड घालून एसआरएफतर्फे रस्ते सुरक्षेला चालना देण्यात येते आणि दीर्घकाळ टिकणारा शाश्वत परिणाम साध्य करण्यात येतो. इतर विजेत्यांमध्ये दि असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसॅबिलिटी (एपीडी), बंगळुरू; इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन (आयजीएफ-इंडिया), दिल्ली; झारखंड विकास परिषद (जेव्हीपी), झारखंड; अलर्ट (ॲमेनिटीलाइफलाइन इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम), चेन्नई; आणि सेफ इंडिया (सोशल असोसिएशन फॉर एव्हरीवन), भुवनेश्वर या संस्थांचा समावेश आहे.
मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड (एमएसआयए) हा भारताच्या वाहतूक क्षेत्राचे स्वरूप बदलणाऱ्या नवोन्मेषी मोबिलिटी उपाययोजनांचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे.
या वर्षी असुरक्षित समुदाय सशक्तीकरण आणि रस्ते सुरक्षा नवोपक्रम व उत्कृष्टता (रोड सेफ्टी इनोव्हेशन अँड एक्सलन्स) या दोन विभागांत मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स प्रदान करण्यात आले. उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र आणि सरकारी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात, या विजेत्या संस्थांना ‘स्नेहालय’चे संस्थापक आणि प्रसिद्ध समाजसेवक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
“सामाजिक हितासाठी वाहतुकीची परिभाषा बदलणाऱ्या या परिवर्तनकर्त्यांचा गौरव करणे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. त्यांचे कार्य सर्वसमावेशक, सुरक्षित आणि सशक्त समुदाय निर्माण करण्याच्या आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे,” असे ब्रिजस्टोन आशिया पॅसिफिकचे ग्रुप प्रेसिडेंट आणि ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. हिरोशी योशिझाने म्हणाले.
असुरक्षित समुदाय सशक्तीकरण या विभागात, दि असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसॅबिलिटी (एपीडी), बंगळुरू या संस्थेला त्यांच्या ‘रिहॅब ऑन व्हील्स’ या उपक्रमासाठी सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या उपक्रमाद्वारे दिव्यांग व्यक्तींना दुर्गम भागांमध्ये पुनर्वसन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. इम्पॅक्ट गुरू फाउंडेशन (आयजीएफ-इंडिया), दिल्ली या संस्थेला ‘एम्पॉवर हर’ आणि ‘मिशन आय-एम-पॉसिबल’ यांसारख्या उपक्रमांसाठी पहिले उपविजेते म्हणून गौरविण्यात आले. आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास या माध्यमातून या संस्थेने 81 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवला आहे. झारखंड विकास परिषद (जेव्हीपी), झारखंड या संस्थेला ज्युरी कमेंडेशन प्रदान करण्यात आले. या संस्थेने 160 हून अधिक गावांमध्ये समुदाय-आधारित कार्यक्रमांद्वारे शाश्वत उपजीविका आणि महिला सशक्तीकरणाला चालना दिली आहे.
रस्ते सुरक्षा नवोपक्रम आणि उत्कृष्टता (रोड सेफ्टी इनोव्हेशन अँड एक्सलन्स) या विभागात, अलर्ट (अॅमेनिटी लाइफलाईन इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम), चेन्नई या संस्थेला सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला. या संस्थेने 4.5 लाखांहून अधिक नागरिकांना जीव वाचवणाऱ्या आपत्कालीन प्रतिसाद कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन सक्षम केले आहे. सेफ इंडिया (सोशल असोसिएशन फॉर एव्हरीवन), भुवनेश्वर या संस्थेला पहिला रनर-अप म्हणून गौरविण्यात आले. या संस्थेच्या # ZoneZero सेफ स्कूल झोन आणि आरएसडीएएस (RSDAS) ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे 40,000 हून अधिक विद्यार्थ्यांच्या आणि 2 लाखांहून अधिक वाहनचालकांच्या सुरक्षेत सुधारणा झाली आहे.
सेफ्टी रिसर्च फाउंडेशनच्या (एसआरएफ) संस्थापक ट्रस्टी जेया पद्मनाभन म्हणाल्या, “ब्रिजस्टोन मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स 2025 मध्ये ज्युरी कमेंडेशन मिळाल्याचा आम्हाला अत्यंत सन्मान वाटतो. रस्ता सुरक्षा ही समुदाय स्तरावरच सुरू झाली पाहिजे, जिथे जनजागृती आणि पायाभूत सुविधा यांची सांगड कृतीशी घातली जाते, अशी ‘ब्रेस’ प्रकल्पामध्ये आमची धारणा आहे. या सन्मानामुळे आम्हाला मुलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या आणि रस्त्यांवर जबाबदारीपूर्ण वर्तन करण्याची आणि रस्त्यांचा वापर काळजीपूर्वक करण्याची संस्कृती विकसित करण्याचे आमचे प्रयत्न अधिक दृढ करण्यास प्रेरणा मिळाली आहे.”
आता आपल्या पाचव्या वर्षात प्रवेश केलेले मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स हा ब्रिजस्टोन इंडियाचा प्रमुख उपक्रम असून, मोबिलिटीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि समुदाय कल्याण साध्य करणाऱ्या, विस्तारक्षम आणि प्रभावी उपाययोजनांचा गौरव करण्यासाठी हा सन्मान प्रदान केला जातो.
या पुरस्कारांच्या ज्युरीमध्ये भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातील इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह फेलोशिपचे सोशल डिफेन्स फेलो श्री. राम शंकर पांडे, मानव संसाधन आणि प्रशासन- कार्यकारी संचालक श्री. सुधीर कुलकर्णी, वित्त आणि माहिती व तंत्रज्ञान – कार्यकारी संचालक ज्योत्स्ना शर्मा, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस, पुणे (महाराष्ट्र) या संस्थेचे माजी संचालक डॉ. दीपक वालोकर, आणि टाटा स्टील सीएएसआरच्या शिक्षण विभागाच्या माजी प्रमुख स्मिता अगरवाल यांचा समावेश होता.
मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स हे ब्रिजस्टोनच्या ई8 कमिटमेंटमधील “एम्पॉवरमेंट”, “ईझ”, “इमोशन” आणि “एफिशियन्सी” या मूल्यांचे प्रतिबिंब आहेत. ही मूल्ये सर्वांसाठी सन्मान आणि उपलब्धता सुनिश्चित करणाऱ्या समाजनिर्मितीतील योगदानाचे (एम्पॉवरमेंट), मोबिलिटीच्या अनुभवात सोयी आणि मन:शांती आणण्याचे (ईझ), मोबिलिटीच्या जगात आनंद आणि प्रेरणा यांचा प्रसार करण्याचे (इमोशन) तसेच मोबिलिटीच्या प्रगतीतून उत्पादकता वाढवण्याचे (एफिशियन्सी) ब्रिजस्टोनचे कॉर्पोरेट उद्दिष्ट स्पष्ट करतात. एमएसआयएसारख्या उपक्रमांद्वारे ब्रिजस्टोन “सर्वोत्तम गुणवत्तेद्वारे समाजाची सेवा” या आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करत आहे, सकारात्मक बदल घडवत आणि भारतभर अधिक सुरक्षित व सर्वसमावेशक समु
दाय निर्माण करत आहे.