पुणे : गणेश रविंद्र पाडळकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘सार्थ सीमारेषा आणि प्रदेशांवर आधारित नैसर्गिक प्रतिमांचे अर्थसंगत विभाजन’ (Semantic Segmentation of Natural Images Based on Semantic Boundaries and Regions) असा होता.
सध्या ते महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
ही पदवी पूर्ण करताना त्यांना डॉ. माधुरी खांबेटे, प्राचार्या व रिसर्च सेंटर प्रमुख, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, पुणे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
गणेश पाडळकर यांनी बी.ई. आणि एम.ई. (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) या दोन्ही पदव्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आर.आय.टी.), साखराळे येथून यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या या शैक्षणिक प्रवासात परमवीर पाडळकर आणि सुभाष मुळे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.