वाढदिवसाचा खर्च टाळून  एअर कमोडर अरुण इनामदार (निवृत्त) यांनी अतिवृष्टीग्रस्तांना केली आर्थिक मदत पुणे

तारां कित Avatar

 

पुणे

(प्रतिनिधी)

अतिवृष्टीमुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सोलापूर व मराठवाड्यातील अनेक

जिल्ह्यातील शेतीपिके,घरदार,संसारोपयोगी साहित्य आणि शेती वाहून गेली आहे.शेतपिके,जनावरे, घरे,रस्ते,शाळा यांचेही नुकसान झाले आहे.अनेक कुटुंबेची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

अशा अतिवृष्टीग्रस्त आणि पुरग्रस्त कुटुंबियांना मदत व्हावी या उद्दिष्टाने एअर कमोडर अरुण इनामदार ( निवृत्त ) यांनी आपला ८१ वा वाढदिवस साजरा न करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीला धनादेश जनकल्याण समितीचे सचिव प्रमोद गोऱ्हे यांचेकडे या सेवा कार्यासाठी सुपूर्द केला.

एअर कमोडर अरुण इनामदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्वेनगर मधील सह्याद्री प्रभात प्रभात शाखेचे स्वयंसेवक असून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे संस्थापक पदाधिकारी आहेत.तसेच एअर कोमोडर अरुण इनामदार यांनी याच कामासाठी एअरफोर्स असोसिएशनला पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली आहे.इनामदार यांच्या पुढाकाराने सर्व निवृत्त वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी मिळून रुपये तीन लाख चा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी व अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत म्हणून दिला आहे.

दरम्यान सामाजिक दायित्वाची जाण ठेऊन अरुण इनामदार यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नंदाजी भागवत,केशव माधव माधव न्यास चे अरविंद देशपांडे, कुलदीप धुमाळे,एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त),एअर व्हाइस मार्शल जयंत इनामदार,ब्रिगेडियर धनंजय विध्वांस,नंदाजी भागवत,रमेश खेडकर,प्रकाश दांडेकर,

भालशंकर शहाजी(पेरूवाले),योग शिक्षक सुभाष फडके,प्रशांत कुलकर्णी,उल्हास सावळेकर,संजय वळसंगकर,नंदकुमार कुलकर्णी,प्रमोद कुलकर्णी,सुरेंद्र प्रधान ,प्रगतिशील शेतकरी भालचंद्र खेनट यांची उपस्थिती होती.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts