पर्यावरणपूरक तसेच सुरक्षित दिवाळीसाठी प्रशासन सज्ज – आयुक्त श्रावण हर्डीकर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता

तारां कित Avatar

पिंपरी, दि. १६ ऑक्टोबर २०२५ : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि ऐक्याचा सण असून, या काळात नागरिकांची दिवाळी आनंददायी, सुरक्षित आणि सुखकर व्हावी तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. दिवाळी काळात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि अग्निशमन यंत्रणा सतर्क ठेवावी, वाहतुकीची योग्य व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि अपघात प्रतिबंधक उपाय तत्परतेने राबवावेत, गर्दीच्या भागांत वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक पथके नेमावीत, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर हे दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहआयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी स्थायी समिती बैठकीत सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत त्यांना मान्यता दिली व शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावा घेतला.

 

 

 

आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत रहाटणी स. नं. ९६ लांडेवाडी, दिघी, चऱ्होली, बोपखेल, कृष्णानगर स. २२, पाटील नगर, जाधववाडी स. १०, गवळीमाथा, सांगवी गावठाण, सांगवी पी डब्ल्यू डी, सांगवी स. नं. ८४, पिंपळे गुरव, दापोडी, थेरगाव गावठाण, थेरगाव स. नं. ९, थेरगाव लक्ष्मणनगर, काळाखडक वाकड, काळाखडक बुस्टर, पुनावळे येथील पंप हाऊसचे चालन करणे (२२-२३) या कामाच्या सुधारित खर्चास मान्यता देणे, फक्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. १२ व १३ मधील पाणीपुरवठ्याच्या विविध कामासाठी केलेले खड्डे हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्त करणे, कासारवाडी पूल ते दापोडी पुलापर्यंतच्या १८ मीटर डीपी रस्ता विकसित करण्याच्या कामासाठी सल्लागार नेमणूक करणे, महापालिकेच्या नवीन रुग्णालय व विविध विभागाकडील मागणीप्रमाणे बेंच खरेदी करणे, दफनभूमीसाठी काळजीवाहक पुरविणे कामी मुदतवाढ देणे, महापालिकेच्या २०७ बालवाड्यांमधील विद्यार्थ्यांना सकर आहार पुरवठा करण्याकरिता मे. अन्नामृत फाउंडेशन पिंपरी यांना द्वितीय मुदतवाढ देणे, महापालिकेच्या विविध विभागातील झेरोक्स मशीन आणि ए३ कलर प्रिंटरसाठी कॅनॉन कंपनीचे टोनर्स एका वर्ष कालावधीसाठी खरेदी करणे, अ, ब, ड व ग क्षेत्रीय अंतर्गत परिसरातील वृक्षांचे, मनपा हद्दीतील वृक्षांचे पुनर्रोपण करणे व तीन वर्ष देखभाल करणे, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामकाजासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देणे, मे. इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, वेस्ट मॅनेजमेंट & रिसर्च सेंटर यांना नवनियुक्त आरोग्य निरीक्षकांच्या प्रशिक्षणाचे बिल अदा करणे, महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेतून मनपा माध्यमिक विद्यालयात अत्याधुनिक सायन्स लॅब विकसित करण्यासाठी कमी येणाऱ्या खर्चास मान्यता देणे, पाणीपुरवठा विभागांतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयातील स. २३-२४ मधील परीचालनाच्या कामांना सुधारित प्रशासकीय रकमेस आणि मुदतवाढीस मान्यता देणे, क व ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध नव्याने विकसित करण्यात आलेले रस्ते दुभाजक याठिकाणी आवश्यकतेनुसार पोयटा माती टाकणे व पसरवणे याबाबत येणाऱ्या खर्चास मान्यता देणे, सन २०२४-२५ या वर्षात घंटागाडी ठेकेदारांना विशेष बाब/बक्षीस देणे, ग क्षेत्रीय कार्यालय परिसरातील शौचालय देखभाल, दुरुस्ती व स्वच्छतेची कामे नवी दीडश योजना अंतर्गत महिला बचत गटांना देण्यात आलेले दररोज शौचालय साफसफाई करणेकामी लहान जेटींग मशीन पुरविलेल्या खर्चास मान्यता देणे, यासह विविध विषयांना मान्यता देण्यात आली.

 

 

 

आयुक्त यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

 

 

 

आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळीसाठी शु

भेच्छाही दिल्या.

 

Tagged in :

तारां कित Avatar