एलअँडटी फायनान्‍स लि. (एलटीएफ)कडून ३० सप्‍टेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या दुसऱ्या तिमाहीसाठी (आर्थिक वर्ष २६ ची दुसरी तिमाही) तिमाही-ते-तिमाही ५ टक्‍के आणि वार्षिक ६ टक्‍के वाढीसह ७३५ कोटी रूपयांच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च करोत्तर नफ्याची (पीएटी) नोंद

तारां कित Avatar

एलअँडटी फायनान्‍स लि. (एलटीएफ) या भारतातील आघाडीच्‍या नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीने (एनबीएफसी) ३० सप्‍टेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या दुसऱ्या तिमाहीसाठी तिमाही-ते-तिमाही ५ टक्‍के आणि वार्षिक ६ टक्‍के वाढीसह ७३५ कोटी रूपयांच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च करोत्तर नफ्याची (पीएटी) नोंद केली आहे. कंपनीने ३० सप्‍टेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या दुसऱ्या तिमाहीसाठी १८,८८३ कोटी रूपयांच्‍या तिमाही रिटेल वितरणाची नोंद केली आहे, ज्‍यामध्‍ये वार्षिक २५ टक्‍क्‍यांची वाढ झाली. ३० सप्‍टेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी रिटेलायझेशन ९८ टक्‍के राहिले.

 

ग्राहकांसाठी शक्तिशाली डिजिटल चॅनेल म्‍हणून उदयास आलेल्‍या कंपनीच्‍या ग्राहक-केंद्रित PLANET अॅपने ३० सप्‍टेंबर २०२५ रोजी २ कोटींहून अधिक डाऊनलोड्सचा टप्‍पा पार केला, ज्‍यामध्‍ये १७.६ लाखांहून अधिक डाऊनलोड्स ग्रामीण भागामधून होते. आजपर्यंत, या चॅनेलने ६,४०० कोटी रूपयांहून अधिक संकलन केले आहे, तसेच ९३४ लाखांहून अधिक विनंत्‍या पूर्ण केल्‍या आहेत आणि १९,३०० कोटी रूपयांहून अधिक कर्ज मिळवले आहेत. PLANET अॅपला ग्‍लोबल फिनटेक फेस्‍ट, २०२५ मध्‍ये ‘बेस्‍ट डिजिटल एक्‍स्‍पीरिअन्‍स इन फायनान्‍स’सह देखील सन्‍मानित करण्‍यात आले.

 

‘प्रोजेक्‍ट सायक्‍लोप्‍स’ टू-व्‍हीलर फायनान्‍स, फार्म इक्विपमेंट फायनान्‍स आणि एसएमई फायनान्‍समध्‍ये राबवण्‍यात आला आहे. आर्थिक वर्ष २६च्‍या तिसऱ्या ति‍माहीत वैयक्तिक कर्जांमध्‍ये, आर्थिक वर्ष २७ मध्‍ये गृहकर्जे आणि ग्रामीण समूह कर्जे व एमएफआयमध्‍ये हा प्रकल्‍प लागू केला जाईल. एआय-संचालित रिअल टाइम ऑटोमेटेड पोर्टफोलिओ मॉनिटरिंग इंजिन ‘प्रोजेक्ट नॉस्ट्राडेमस’ची बीटा आवृत्ती दुचाकी व्यवसायासाठी ऑगस्ट २०२५ मध्ये नियोजित तैनाती तारखेच्या एक महिना आधी सुरू करण्यात आली आहे.

 

एसअँडपी ग्लोबल रेटिंग्जने एलटीएफचे दीर्घकालीन इश्युअर क्रेडिट रेटिंग “BBB-/Positive” वरून “BBB/Stable” आणि अल्पकालीन इश्युअर क्रेडिट रेटिंग ‘A-3’ वरून ‘A-2’ पर्यंत अपग्रेड केले आहे. फिच रेटिंग्जने एलटीएफचे दीर्घकालीन परदेशी आणि स्थानिक चलन इश्युअर डीफॉल्ट रेटिंग्ज “BBB-” स्थिर दृष्टिकोनासह नियुक्‍त केले आहेत. हे दीर्घकालीन रेटिंग गुंतवणूक श्रेणीचे आहेत आणि भारताच्या सार्वभौम क्रेडिट रेटिंगच्या समतुल्य आहेत. यामुळे कंपनी जागतिक भांडवली बाजारपेठांमध्ये प्रवेश करू शकेल आणि आपल्‍या दायीत्व फ्रँचायझीमध्ये आणखी वैविध्यता आणू शकेल व गुंतवणूकदार समूह वाढवू शकेल.

 

या आर्थिक निकालांबाबत मत व्‍यक्‍त करत एलटीएफचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. सुदिप्ता रॉय म्‍हणाले, ”तिमाहीदरम्‍यान आम्‍ही अंमलबजावणी व विकासावर मुख्‍यत्‍वे लक्ष केंद्रित केले, ज्‍यामुळे आम्‍हाला पूर्वापार बीएफएसआय उद्योगामध्‍ये कमकुवत मानल्‍या जाणाऱ्या तिमाहीत प्रबळ कामगिरी करता आली. या कामगिरीमधून ग्रामीण व शहरी भागांमधील आमच्‍या सर्व व्‍यवसायांमध्‍ये सुधारित गती दिसून येते, ज्‍याला गेल्‍या काही तिमाहींमध्‍ये राबवण्‍यात आलेल्‍या परिवर्तनात्‍मक उपक्रमांचे पाठबळ मिळाले आहे. आमच्‍या ५-आधारस्‍तंभ अंमलबजावणी धोरणाचा भाग म्‍हणून तंत्रज्ञान, टॅलेंट, शाखा पायाभूत सुविधांची सुधारणा व विस्‍तारीकरण, ब्रँड निर्मिती आणि ग्राहक केंद्रित्वावरील सातत्‍यपूर्ण फोकसमधील आमच्‍या गुंतवणूकांचे आम्‍हाला लवकर लाभांश मिळण्‍यास सुरूवात झाली आहे.

 

या आर्थिक वर्षाच्‍या पहिल्‍या तिमाहीत कर्ज पोर्टफोलिओमध्‍ये भर करण्‍यात आलेल्‍या आमच्‍या सुवर्ण कर्ज विभागाला या तिमाहीमध्‍ये मोठी गती मिळाली. संपूर्ण भारतात आघाडीची गोल्‍ड फायनान्‍स कंपनी बनण्‍याच्‍या आमच्‍या महत्त्वाकांक्षेची बांधील राहत आम्‍ही शाखा विस्‍तारीकरणाच्‍या माध्‍यमातून देशामध्‍ये आमची भू-उपस्थिती वाढण्‍यास कटिबद्ध आहोत. या आर्थिक वर्षाच्‍या शेवटी आमची जवळपास २०० नवीन शाखा असण्‍याची योजना आहे, ज्‍यासह आमची सोने वितरण क्षमता जवळपास ३३० सुवर्ण कर्ज शाखांपर्यंत पोहोचेल.

 

याव्‍यतिरिक्‍त, कंपनीने टू-व्‍हीलर व्‍यवसायामधील एआय संचालित ऑटोमेटेड रिअल-टाइम पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इंजिन ‘प्रोजेक्‍ट नॉस्‍ट्रोडेमस’ची बीटा आवृत्ती सुरू केली, तसेच एसएमई व्‍यवसायामध्‍ये एआय संचालित नेक्‍स्ट-जनरेशन डिजिटल क्रेडिट इंजिन ‘प्रोजेक्‍ट सायक्‍लोप्‍स’ वाढवले आहे. या आर्थिक वर्षाच्‍या दुसऱ्या तिमाहीत आमच्‍या डिजिटल मोठ्या भागीदारी वाढत राहिल्‍या, जेथे वैयक्तिक कर्ज सुरू करण्‍यासाठी गुगल पे हे आमच्‍या मार्की मोठ्या तंत्रज्ञान सहयोगींच्‍या यादीमध्‍ये नवीन भर आहे.

 

उत्तम मान्‍सून आणि ग्राहक वापर भावनेमध्‍ये सुधारणेसह आम्‍हाला विश्वास आहे की, जीएसटी २.० सुधारणेमुळे उत्‍सवी मागणी वाढली असल्‍याने या आर्थिक वर्षाच्‍या दुसऱ्या सहामाहीत ही गती वाढेल.”

 

ठळक वैशिष्‍ट्ये:

 

प्रबळ रिटेल फ्रँचायझी:

 

कंपनीच्‍या विस्‍तृत व भारतभरातील रिटेल फ्रँचायझीचे नेतृत्‍व प्रबळ वितरण क्षमतांद्वारे केले जाते, जेथे जवळपास २ लाख गावांमध्‍ये उपस्थिती असण्‍यासोबत जवळपास २,२१३ ग्रामीण बैठक केंद्रे/शाखा आणि शहरी केंद्रांमध्‍ये ३४५ शाखा आहेत. या व्‍यापक भौगोलिक उपस्थितीला दशकाहून अधिक काळापासून निर्माण केलेल्‍या १३,५०० हून अधिक वितरण केंद्रांचे पाठबळ आहे. कंपनी विश्वसनीय क्रॉस-सेल व अप-सेल फ्रँचायझीला चालना देण्‍यासाठी जवळपास २.७ कोटींहून अधिक ग्राहक डेटाबेसचा फायदा घेते, ज्‍याने आर्थिक वर्ष २६ च्‍या दुसऱ्या तिमाहीदरम्‍यान कंपनीच्‍या पुनरावृत्ती वितरणामध्‍ये मूल्‍यासंदर्भात ४९ टक्‍क्‍यांचे आणि संख्‍येसंदर्भात ५१ टक्‍क्‍यांचे योगदान दिले.

 

वैविध्‍यपूर्ण रिटेल फ्रँचायझीची निर्मिती:

 

रूरल बिझनेस फायनान्‍स (ग्रामीण व्‍यवसाय वित्तपुरवठा):

 

· आर्थिक वर्ष २६ च्‍या दुसऱ्या तिमाहीत वितरण ५,४३५ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक १६ टक्‍के वाढीसह ६,३१६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.

 

· बुक आकार २६,५३९ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक ३ टक्‍के वाढीसह २७,४६० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला.

 

· या वाढीचे क्षेत्र सुधारित संकलन कार्यक्षमता आणि विभागीय ट्रेण्‍ड्सना जाते.

 

फार्मर फायनान्स (शेतकरी वित्तपुरवठा):

 

· आर्थिक वर्ष २६ च्‍या दुसऱ्या तिमाहीत वितरण १,७८२ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक ७ टक्‍के कपातीसह १,६५४ कोटी रूपयांपर्यंत कमी झाले.

 

· बुक आकार १४,४८८ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक १० टक्‍के वाढीसह १५,९४३ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला.

 

टू-व्‍हीलर ‍फायनानस (दुचाकी वित्तपुरवठा):

 

· आर्थिक वर्ष २६ च्‍या दुसऱ्या तिमाहीत वितरण २,३९३ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक ५ टक्‍के वाढीसह २,५१२ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.

 

· बुक आकार १२,६६९ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक ३ टक्‍के वाढीसह १३,०१३ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला.

 

· तिमाहीदरम्‍यान एलटीएफने त्‍यांचे ब्रँड अॅम्‍बेसेडर जसप्रीत बुमराह असलेली टीव्‍ही कमर्शियल (टीव्‍हीसी) ‘जस्‍ट झूम टू-व्‍हीलर लोन्‍स’ लाँच केली. ही टीव्‍हीसी एलटीएफच्‍या दुचाकी कर्जाची प्रमुख वैशिष्‍ट्ये त्‍वरित मान्‍यता, अधिकतम कर्ज पात्रता आणि स्‍पर्धात्‍मक ईएमआय यांना दाखवते.

 

· सणासुदीच्‍या काळासाठी आकर्षक टू-व्‍हीलर फायनान्‍स स्किम्‍स लाँच.

 

वैयक्तिक कर्ज:

 

· आर्थिक वर्ष २६ च्‍या दुसऱ्या तिमाहीत वितरण १,३६१ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक ११४ टक्‍के वाढीसह २,९१८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.

 

· बुक आकार ७,१७८ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक ५२ टक्‍के वाढीसह १०,८७८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला.

 

· विभागातील वाढीला मोठ्या तंत्रज्ञान सहयोगांचे पाठबळ मिळाले.

 

गृहकर्ज व मालमत्तेवरील कर्ज:

 

· आर्थिक वर्ष २६ च्‍या दुसऱ्या तिमाहीत वितरण २,५३१ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक ७ टक्‍के वाढीसह २,७१३ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.

 

· बुक आकार २१,७३१ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक १६ टक्‍के वाढीसह २७,४०७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला.

 

एसएमई फायनान्‍स:

 

· आर्थिक वर्ष २६ च्‍या दुसऱ्या तिमाहीत वितरण १,२४४ कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक १८ टक्‍के वाढीसह १,४६८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.

 

· बुक आकार ५,१९० कोटी रूपयांच्‍या तुलनेत वार्षिक ४४ टक्‍के वाढीसह ७,४६५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला.

 

सुवर्ण कर्ज:

 

· आर्थिक वर्ष २६ च्‍या दुसऱ्या तिमाहीत वितरण ९८३ कोटी रूपये होते.

 

· बुक आकार १,४७५ कोटी रूपये होता.

 

Tagged in :

तारां कित Avatar