विजयदुर्ग प्रतिकृती आणि दीपोत्सवातून भारतीय सैन्याला सलाम सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे संस्थेतर्फे गुरुवर्य आबासाहेब नातू दीपोत्सव

तारां कित Avatar

पुणे : भारतातील सर्वात जुन्या स्काऊट गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावरील श्री शिवाजी कुल, पुणे संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त विजयदुर्ग प्रतिकृती साकारण्यात आली. तसेच गुरुवर्य आबासाहेब नातू दीपोत्सवातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला.

 

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे यंदा ही प्रतिकृती साकारण्यात आली.

 

तर, गुरुवर्य आबासाहेब नातू दीपोत्सवातून ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय सैन्यदलाने दाखविलेल्या शौर्याला सलाम करण्यात आला. मैदानावर तब्बल १ हजार १११ पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. संस्थेतील बनी, कब, बुलबुल, स्काऊट, गाईड व अधिकारी यावेळी स्काऊटच्या गणवेशात उपस्थित होते.

Tagged in :

तारां कित Avatar